जर कुठे दिसली ही भाजी तर लगेच घेऊन या; मधुमेहावर अत्यंत उपयुक्त आहे ही भाजी.!

आरोग्य

आपण अनेक आजारांवर अनेक प्रकारच्या भाज्या खातो. सगळ्याच भाज्यांमध्ये उपयुक्त अशी जीवनसत्त्वे तसेच योग्य प्रमाणात खनिजे मिळतात. तशीच एक भाजी म्हणजे अळूचे मूळ म्हणजेच अळकुडी. आपल्याला सगळ्यांना अळू माहीतच असेल. याचे अनेक पदार्थ आपण खातो. त्यातच सर्वात लोकप्रिय म्हणजे अळूची वडी आणि अळूचे फतफत.

महाराष्ट्रीय जेवणाचा अविभाज्य भाग अळूची भाजी. वडीचा अळू व भाजीचा अळू वेगळा असतो. भाजीच्या अळूचे देठ पारदर्शक असते, तर वडीच्या अळूचे काळपट असते, पानेही थोडी काळसर असतात. अळूची लागवड कंद लावून करतात. हे कंद म्हणजेच अळकुडी. अळकुड्यांचीसुद्धा भाजी करता येते, नाहीतर नुसत्या उकडूनही खाता येतात.

अळूच्या मुळाला अनेक ठिकाणी वेगवेगळी नावे असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि तंतू असतात. हे तंतू शरीरातील इन्सुलिन वाढवण्यासाठी मदत करतात. तसेच ही अळूच्या मुळांची भाजी शरीरातील साखर सुद्धा नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ही भाजी बाजारात सहज उपलब्ध होते. या भाजीत तंतुमय पदार्थ, व्हिटॅमिन अ, क, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात. ही भाजी अनेक प्रकारे खाल्ली जाते.

हे वाचा:   शरीरातली नको ती चरबी अशी कमी होत गेली.! बघता बघता चरबी मेनासारखी पघळली.! जाणून घ्या कशी.!

तसेच ही भाजी अतिशय गुणकारी मानली जाते. ही भाजी पोटाच्या विकारांवर अतिशय उपयुक्त आहे. अळूच्या पानांचं कंदमूळ म्हणजे अळकुडी किंवा अरवी, हेही वर्षभर बाजारात मिळणारं कंदमूळ आहे. महाराष्ट्रीय खाद्यपदार्थामध्ये याचा फारच कमी प्रमाणात वापर होतो. पंजाबी पद्धतीच्या खाद्यपदार्थामध्ये अळकुडीपासून विविध प्रकारच्या पाककृती बनवल्या जातात.

हे कंदमूळही खाजरं असतं तसंच त्याची सालं काढताना, चिरताना त्यातून चिकट स्त्राव पाझरतो. म्हणूनच त्याचा वापर करताना, ते सुरणाप्रमाणेच कोकम, लिंबू वा चिंचेच्या पाण्यात वाफवून घेतल्याने त्याचा चिकटपणा व खाजरेपणाही निघून जातो. हे कंदमूळ सप्तधातूवर्धक तसंच जीवनसत्त्वयुक्त आहे. या कंदमुळाचा उपवासाच्या पदार्थामध्येही वापर करू शकतो. हे उकडल्यावर याची कोणत्याही प्रकारचे भाजी करता येते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींचे प्रमाण हल्ली खूप वाढत चालले आहे. यावर रासायनिक औषधे घेऊन आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसत आहेत. अळूच्या मुळांमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय घटक असतात. हे शरीरातील इन्सुलिन वाढवण्यास मदत करतात. तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींची साखर सुद्धा नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

हे वाचा:   सकाळी उठल्यानंतर या चुका करणाऱ्या लोकांना दिवस कधीच चांगला जात नसतो.!

साठवलेले अन्न खाणे, चुकीची जीवनशैली , चुकीच्या जेवणाच्या वेळा अशा अनेक कारणांमुळे पोटासंबंधीत आजार होताना आपल्याला दिसतात. बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधित आजार , ही भाजी खाल्ल्याने बरे होतात. अळूच्या मुळांचा काढा करून पिल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो..या भाजीत पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असतात. जे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच शरीराचा तणाव देखील याने दूर होतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *