उन्हाळ्यात हिरव्या कोथिंबीर चा फेस पॅक लावा, त्वचा चमकत जाईल. कोथंबीर अनेकजण जेवणात वापरतात. अन्नाची गोडी वाढवतात. शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणात सुद्धा कोथंबीर चा वापर अनेक जण करतात करतात जण करतात करतात वापर अनेक जण करतात करतात जण करतात चा वापर अनेक जण करतात करतात जण करतात करतात वापर अनेक जण करतात करतात.
कोथिंबीरीच्या वडया चटणी आणि कोशिंबीर लोकप्रिय आहे. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. तसेच, हे चमकदार त्वचेसाठी देखील वापरता येतात. त्वचेवर ही कोथंबीर वापरल्याने सुरकुत्या आणि मुरुम कमी होण्यास मदत होते. तसेच मुरुमांच्या समस्येवरही विजय मिळतो. चला मग याचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
साहित्य- कोथिंबीरची ताजी पाने, १ टेस्पून ताजे दही,१ टीस्पून हरभरा पीठफेस पॅक बनविण्याची पद्धत:- फेस पॅक करण्यासाठी प्रथम ताजी कोथिंबीर बारीक करून पेस्ट बनवा. त्यात दही आणि हरभरा पीठ मिक्स करा. चांगले मिसळा आणि त्वचेवर लावा. ते वीस मिनिटे ठेवा , मग तोंड धुवा.
कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन सी, एंटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हिरवी कोथिंबीर सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा प्रतिबंध देखील करते आणि त्वचा ओलसर ठेवते. कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात.
मधुमेह रूग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करते. कोथिंबीर ताज्या ताकात टाकून प्यायल्याने अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेल्या सूजेपासून बचाव करता येतो. कोथिंबीरीची पाने बारीक करून १ चमचा प्रमाणात चिमुटभर हळद मिसळून हे मिश्रण दिवसातून कमीतकमी दोन वेळेस लावल्यास मुरुमांची समस्या दूर होते.
टायफाइड झाल्यास कोथिंबर खाल्यानं फायदा होतो. कोरडे धणे पाण्यात उकळून पाणी गाळून थंड करावं. ते पाणी पिल्यानं कॉलेस्ट्रालची पातळी कमी करता येते. कोथिंबीर आपल्या शरीराला हानी पोचवणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करून आपल्या शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल ला वाढवण्यास मदत करते.
कोथिंबीर खाल्ल्याने आपल्या शरीरात ‘विटामिन ए’ ची कमतरता होत नाही ज्यामुळे आपले डोळे नेहमी चांगले राहतात. कोथिंबीर, हिरवी मिर्ची, किसलेलं खोबरं आणि आलं घालून चटणी खाल्लानं अपचनामुळं होणारी पोटदुखीत आराम मिळतो. हिरवी ताजी कोथिंबीर पाचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. कोथिंबीरीची हिरवी पाने पित्तनाशक असतात.
हे पाचन तंत्रासाठी देखील फायदेशीर आहे. हे यकृताची सक्रियता वाढविण्यात मदत करते. पीरियड संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी देखील हिरवी कोथिंबीर उपयुक्त आहे. फ्रीजमध्ये ठेवलेली अतिशिळी कोथिंबीर वापरू नये. तिचा स्वाद व औषधी गुणधर्म कमी होतात. ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून वापरावी. कोथिंबीर न धुता वापरल्यास आजारांची लागण होऊ शकते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.