जास्त उष्णतेमुळे बर्याच लोकांच्या किंवा मुलांच्या नाकातून रक्त येऊ लागतं. मुलांमध्ये, ही समस्या उन्हाळ्याच्या काळात जास्त प्रमाणात दिसून येते. त्याचबरोबर काही लोकांना गरम पदार्थ खाऊन किंवा उंचीच्या ठिकाणी जाऊनही या समस्येचा सामना करावा लागतो. सर्दीमध्ये नाक ओढताना अथवा वारंवार पुसताना, शिंकरताना नाकामधील छोटया रक्तवाहिन्या फुटल्यास सामान्यत: नाकातून रक्त येण्याची शक्यता असते.
नाकात आत पृष्ठभागाच्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे रक्तस्राव होणे एक समस्या आहे. जरी ही एक सामान्य समस्या आहे. परंतु वारंवार रक्तस्राव होणे आरोग्यासाठी चांगले नाही. कोरड्या हवेमुळे सामान्यत: नाकातून रक्त येण्याची समस्या निर्माण होते. वातावरणातील बदल अथवा घरातील वातानूकुलीत उपकरणे यामुळे हवा कोरडी होऊ शकते. त्यामुळे नाकामधील टीश्यूज कोरड्या व कडक होतात.
उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना नाकातून रक्त येण्याचा त्रास होऊ शकतो. सल्फरीक अॅसिडस,अमोनिया,गॅसोलीन आणि इतर केमिकल्स इरीटन्ट्सच्या संपर्कात आल्यास नाकातून रक्त येऊ लागते.केमिकल कंपनी व केमिकल्सचा वापर केल्या जाणा-या ठिकाणी काम करण्या-या लोकांमध्ये हे लक्षण प्रामुख्याने आढळते. एखादा अपघात अथवा नाकावर मुक्का बसल्यास नाकातून रक्त येते.नाकाला गंभीर जखम होणे,डोक्याला मार लागणे अथवा अंतर्गत रक्तस्त्रावाचे हे लक्षण एक असू शकते.
तसेच रक्त पातळ राहण्याच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तींची रक्त गोठवण्याची प्रक्रिया मंद झालेली असते त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येण्याचे प्रमाण जास्त असते. सर्दी व तापामुळे देखील नाकातून रक्त येऊ शकते.सर्दी खरंतर वर्षभरात खरंतर कधीही होऊ शकते.पण सामान्यत: सर्दी होण्याचे अधिक प्रमाण हे हिवाळ्यात असते. आज आम्ही आपल्याला ही समस्या सोडवण्याचे काही मार्ग सांगणार आहोत, चला जाणून घ्या.
नाकावर एक थंड आणि ओले कापड ठेवा जेणेकरून रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तस्त्राव थांबतो. नाकातून रक्त येऊ लागल्यास बर्फ कपड्यात गुंडाळून नाकावर ठेवल्याने फायदा होईल. फक्त एकाच नाकपुड्यातून रक्त येत असेल तर नाकाच्या वरच्या भागावर दाबून धरा. तथापि, जर रक्तस्त्राव थांबला नाही तर दहा मिनिटे दाबून धरा. खाण्याची पाने बेक करुन त्यात साखर कँडी किंवा साखर मिसळा आणि प्यायल्यास नाकातून रक्त येणे थांबते.
रात्री एक चमचा मुलतानी माती अर्धा लिटर पाण्यात भिजवा. सकाळी ते पाणी फिल्टर करून पिल्यामुळे नाकातून रक्तस्त्राव होण्यास त्रास कमी होईल. घरातील तापमान आणि आर्द्रता नेहेमी समान राहील असे पहावे. म्हणजे वारंवार फॅन, एसी लावणे, बंद करणे असे करू नये. सलग एकसारखे तापमान ठेवावे. नाकाच्या आतील भागात पेट्रोलियम जेली लावावी. कोरडे पडलेले नाक बोटाने कुरतडू नये.
एखादे वेळी जर तुमच्या नाकातून रक्त आले तर घाबरून जाऊ नका. वर सांगितलेले उपाय करा. वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.