उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. आपल्या चेहऱ्यावरील त्वचा इतकी नाजूक असते की या त्वचेला कुठल्याही प्रकारचे हवामान सहन होत नाही. आपल्याकडे तीन ऋतू असतात प्रत्येक वेळी ऋतू बदलल्यानंतर हवामान देखील बदलत असते. अशावेळी आरोग्य देखील बिघडत असते. बदलत्या हवामानामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार देखील होत असतात. तसेच चेहऱ्यावरती देखील याचा परिणाम भरपूर प्रमाणात दिसत असतो.
उन्हाळा सुरू झाल्यानंतर त्वचेवर ती सनबर्न येणे, पिंपल्स येणे, पुटकुळ्या येणे इत्यादी प्रकारच्या समस्या निर्माण होणे सुरू होत असते. इत्यादी प्रकारच्या समस्या उद्भवू नये यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करायला तयार असतो. यासाठी आपण अनेक महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा देखील वापर करत असतो. परंतु याचा त्वचेला काहीही फायदा होत नाही. उलट त्यामुळे त्वचेचे नुकसानच होत असते. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये अनेक प्रकारचे केमिकल युक्त पदार्थ असतात. जे आपल्या त्वचेला धोका पोहोचवत असतात.
आपल्याला निलगिरी तेल हे माहीतच असेल. निलगिरी तेल हे नैसर्गिक तेल आहे व हे त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. अनेकांना माहिती नसेल की निलगिरी तेल नेमकी आहे तरी काय. तर निलगिरी तेल हे निलगिरीच्या पानांपासून बनवले जाते. निलगिरीच्या तेलामध्ये अनेक प्रकारचे पाकृतिक तत्व असतात. ज्यापासून अनेक प्रकारच्या साबणी तसेच शॉवर जेल, ब्युटी प्रॉडक्ट बनवले जातात. निलगिरी तेल हे अँटी फंगल देखील असते. यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याच्या समस्येवर आळा घातला जाऊ शकतो.
जर निलगिरीच्या तेलाचा नियमित स्वरूपात उपयोग केला गेला तर यामुळे तुमचा चेहरा आणखी उजळ झालेला तुम्हाला दिसेल. निलगिरीचे तेल हे जीवाणू विरोधी असते यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म सामावलेले असतात. यामुळे त्वचेवरती जखम झालेली असेल तर ती बरी होत असते. चेहर्यासाठी याला खूपच चांगले सांगितले जाते. कारण चेहऱ्यावरील सर्व काळ्या डागांना, पुटकुळ्या यांना घालवण्याचे काम निलगिरी तेल चांगल्या प्रकारे करू शकते.
त्वचेला खाज येत असेल तर अशावेळी निलगिरीचे तेल लावायला हवे. कारण निलगिरीच्या तेलामध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात. ज्यामुळे फंगल इन्फेक्शन सारखी समस्या बरी होऊ शकते. निलगिरीच्या तेलाचे अनेक फायदे आरोग्य शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. निलगिरी तेलाचे हे फायदे आपल्याला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की कळवा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.