आपल्या या सृष्टीत अनेक उपयोगी फळे, फुले, झाडे आहेत. काही फळे आहेत ज्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म आपल्यासाठी अपरिचित आहेत. पिताया म्हणजेच ड्रॅगन फळ हे एक असे फळ आहे जे बाहेरून विचित्र वाटू शकते परंतु ते आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जरी ड्रॅगन फळ हे भारताचे फळ नसले तरी त्याची उत्कृष्ट चव व फायदे यामुळे भारतातील या फळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हे फळ मऊ, चवदार आणि रसदार आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन तीन प्रकारांत हे फळ येते. ड्रॅगन फळ अँटिऑक्सिडेंट्स, फायबर, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि प्रथिने इत्यादी पोषक प्रमाणात उपलब्ध आहे. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
एकदम भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते. आणि शरीराला अनेक आजारांपासून मुक्त करते. आज आम्ही तुम्हाला याचे फायदे सांगणार आहोत. एकदा नक्की वाचा. रक्तातील साखरेचे प्रमाण ड्रॅगन फळाच्या सेवनाने नियंत्रित केले जाते. कारण ड्रॅगन फळांमध्ये आढळणारा फायबर रक्तातील साखर नियंत्रित करतो. आणि पचन तंत्रालाही ठीक ठेवते.
पिताया (ड्रॅगन फ्रूट) मध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट घटक एखाद्या व्यक्तीचे वय वाढवत नाही आणि त्या व्यक्तीला तरूण ठेवते. ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे.
पिताया फळांच्या म्हणजेच ड्रॅगन फळाच्या रसात मध घालून त्वचेवर लावल्यास त्वचा उजळते. आणि सूर्यापासून होणार्या हानिकारक किरणोत्सर्गापासून ते त्वचेचे रक्षण करते. विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही. ज्यामुळे शरीराला बर्याच संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण देण्यात मदत होते. आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते. यात लोह आणि फायबर असते जे आपल्याला निरोगी ठेवते.
डेंगू झाल्यास या फळांचा खूप फायदा होतो. डेंग्यूमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तसेच हाडे कमजोर होतात. यावर हे फळ खूप फायदेशीर आहे. या फळांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. आणि वजन नियंत्रित राहते. पिताया म्हणजे ड्रॅगन फळात आढळणारे अँटीऑक्सिडेंट घटक कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करतात.
ड्रॅगन फ्रुट हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते. ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह(डायबिटीज) नियंत्रित करण्यास मदत होते. तसेच यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होण्यासाठी मदत होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.