भयंकर अशा रोगापासून वाचायचे असेल तर हे नक्की वाचा, आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे नक्की पालन करा, इम्मुनिटी दहापट वाढेल…!

आरोग्य

सध्या त्या को रो ना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. यापासून वाचण्यासाठी आपण आपली इम्मुनिटी चांगली ठेवणे खूप आवश्‍यक आहे. इम्मुनिटी ला मजबूत बनवण्यासाठी आयुष मंत्रालयाने काही सूचना दिल्या आहेत ज्यांचे पालन केले नैसर्गिक पद्धतीने पण इम्मुनिटी सहजपणे वाढवू शकतो.

इम्मुनिटी ला वाढवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे सप्लीमेंट चे सेवन करत असतो परंतु त्या ऐवजी जर आपण दररोज चवनप्राश खाल्ले तर त्याचा फायदा आपल्या शरीराला भरपूर असा होऊ शकतो. अन्यथा दिवसभरातून एक किंवा दोन वेळेस हळदीचे दूध प्यावे यामध्ये तुळस, दालचिनी, काळीमिरी, आद्रक टाकावे. अशा प्रकारचा आयुर्वेदिक काढा बनवून पिल्यास शरीर आणखी मजबूत होत असते.

सर्दी-खोकला होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यावी. थंड पदार्थांचे सेवन करू नये. तसेच तेलकट पदार्थ देखील जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे घश्यासंबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. जर कधी घश्या संबंधीच्या समस्या निर्माण झाल्या तर अशावेळी थोड्या गरम पाण्यामध्ये चुटकीभर मीठ आणि हळद टाकून याच्या गुळण्या कराव्या. यामुळे घशाला भरपूर असा आराम मिळत असतो.

हे वाचा:   मनका दुखी आणि कंबरदुखी पासून त्रस्त झाला का? आता करा याचा परमनंट इलाज.!

घरगुती पद्धतीने बनवलेले अन्न सेवन करावे. पौष्टिक अन्न सेवन केल्यामुळे अनेक आजार होत नाही. शक्यतो सध्या बाहेरच जेवण टाळावेच. यामुळे अनेक भयंकर आजार उद्भवण्याची शक्यता असते. घरगुती पद्धतीने बनवलेल्या भोजनामध्ये हळद, जिरे, लसूण अद्रक आणि धने यांसारख्या मसाल्यांचा उपयोग करावा. या पदार्थांचा वापर केल्यामुळे अगदी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही तुमच्या शरीराची इम्युनिटी वाढवू शकता.

आरोग्य संबंधी चिंता सतत सतावत असेल तर अशावेळी सकाळच्या वेळी उठून थोडासा योग करावा. सध्याच्या काळामध्ये बाहेर फिरता येत नाही परंतु घरी बसून देखील आपण योग अभ्यास करू शकतो. तसेच थोडासा व्यायाम करू शकतो. व्यायामामुळे शरीराला ऊर्जा मिळत असते तसेच अनेक भयंकर आजारांपासून लढण्याची ताकद मिळत असते. अशा प्रकारचे काही नियम पाळले तर आपण भयंकर अशा आजारांपासून नक्कीच दूर राहू.

हे वाचा:   फक्त चारच दिवसात केस लांबसडक बनतील, एकही केस गळणार नाही, केसांसाठी करा हा नैसर्गीक, स्वस्त उपाय.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *