आपल्याला अनेक प्रकारचे लहान-मोठे आजार होत असतात. आपल्याला उद्भवणारे सर्व आजार हे आपल्या सवयींवर अवलंबून असतात. जर आपल्याला आजार मुक्त व्हायचे असेल तर चांगल्या सवयी असणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक जेवणानंतर अशा काही चुका करत असतात ज्याचा परिणाम त्यांना शरीरावर दिसून येत असतो. जेवणानंतर अशी काही कामे आहेत जे बिलकुल करू नयेत.
याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत असतो. जेवणानंतर तुम्हाला हे कामे करण्याची सवय असेल तर ही सवय आजच्या आज मोडून टाकावी, यामुळे शरीराचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असू शकते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांना दोनदा तीनदा आंघोळ करायला खूप आवडत असते. कारण थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरीर खुपच मोकळे झाल्यासारखे वाटत असते.
अनेक लोकांना जेवणानंतर अंघोळ करण्याची सवय असते. परंतु ही सवय अत्यंत वाईट असल्याचे सांगितले जाते. यामुळे शरीराची पचन क्रिया बिघडत असते. पचना संबंधीच्या समस्या यामुळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर लगेच अंघोळ करू नये जेवण केल्यावर काही काळ बसून काही वेळाने अंघोळ करावी.
रात्रीच्या वेळी ब्रश करणे अतिशय उत्तम मानले जाते. प्रत्येकाने दररोज नेहमी दोनदा ते तीन दा ब्रश करायला हवा. यामुळे दातांना आणखी मजबुती मिळत असते. परंतु जेवण केल्याबरोबर लगेच दात घासणे अतिशय चुकीचे आहे. कारण आपण काही हाय एसिड युक्त पदार्थ खात असतो. जेवण केल्यानंतर या पदार्थांचे काही कण जाताना तसेच चिकटलेले असतात.
यामुळे दात स्वच्छ होण्या ऐवजी दातांची वरची लेयर आणखी कमी होऊ लागते. कधीही जेवण केल्यानंतर जवळपास तीस मिनिटां पर्यंत दात घासू नयेत. अनेकांना वाटत असते की सकाळी आणि सायंकाळी थोडेसे अन्न खाऊन व्यायाम केला तर यामुळे शरीर खुपच आरोग्यदायी राहते. परंतु खाल्ल्यानंतर लगेचच व्यायाम करणे सुरू केले तर यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
जेवण केल्यानंतर लगेच जर अशा प्रकारे व्यायाम करणे सुरू केले तर पोट दुखणे, उलटी होणे यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर कमीत कमी पंचेचाळीस ते साठ मिनिटांपर्यंत व्यायाम करू नये. जेवणानंतर काही लोक लगेच आडवे होत असतात परंतु असे करणे देखील चुकीचे मानले जाते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.