अंडी आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम मानली जातात. यामध्ये भरपूर प्रोटीन असते. त्यामुळे आपल्याला याचे नियमित स्वरूपात सेवन करण्याचा सल्ला दिला जात असतो. अंड्याचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. अनेक लोक अंड्याचे आमलेट बनवतात तर अनेक लोक याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवून खात असतात.
अनेक जण तर अंड्याला उकडवून खात असतात. अंड्यामधील आत मधला भाग खाल्ला जातो व वर असलेले कडक टरफल बाहेर फेकून दिले जाते. आपण याला काही कामाचे नाही म्हणून फेकून देत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या फेकून दिलेल्या अंड्याच्या टरफलांचा अशा प्रकारेही उपयोग केला जाऊ शकतो.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अशा समस्या निर्माण होत असतात या काही समस्यांवर अंड्याची टरफले उपयोगात येऊ शकतात. हे एकायला तुम्हाला खूपच विचित्र वाटत असेल परंतु हे सत्य आहे. आजच्या या लेखामध्ये आपण अंड्याच्या टरफला विषयी माहिती पाहणार आहोत. याचा अशाप्रकारेही वापर होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेऊया.
तुम्हाला जर हे आवडले तर तुम्ही पुढच्या वेळी अंड्याची टरफले कचरापेटीत कधीच टाकणार नाहीत. आपण ज्या अंड्यांना खातो त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते परंतु, जे अंड्याचे टरफले फेकून देत असतो त्या टरफला मध्ये 95 टक्के कॅल्शिअम आणि कार्बोनेट असते. याचा उपयोग खत म्हणून देखील केला जाऊ शकतो. या अंड्यांचा चुरा करून बागे मधल्या कुंड्यांमध्ये टाकल्यास यामुळे झाडांना खुपच चांगले असे खत मिळत असते.
अंड्याची टरफले घाण असलेल्या भांड्यांना किंवा जळालेल्या भांड्यांना खूपच चांगल्या प्रकारे साफ करू शकतात. यासाठी भांडी घासण्याच्या साबणाचे थोडेसे पाणी करावे यामध्ये अंड्याचा टरफलांची पावडर करून टाकावी. या मिश्रणाने भांडी घासल्यास भांडी खूपच स्वच्छ होत असतात.
अंड्याची टरफले चेहऱ्यासाठी देखील अतिशय उत्तम मानले जातात. यासाठी अंड्याची टरफले घेऊन उन्हामध्ये कडक वाळू द्यावीत. त्यानंतर या टरफलांची चांगल्याप्रकारे पावडर बनवून घ्यावी. बनवलेली ही पावडर पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्यास यामुळे चेहरा उजळला जातो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.