घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा या तीन पिठाच्या गोळ्या.! घरात एकही झुरळ फिरकणार सुद्धा नाही.! घरगुती कमी खर्चिक उपाय.!

आरोग्य

जेव्हा या पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी अनेक प्राणी, पक्षी व सूक्ष्म जीव जंतू उदयास आले. या मध्ये हत्ती सारखे अवाढव्या तर काही मुंगी एवढे इवलेसे देखील आहेत. ठिक-ठिकाणी आपल्याला प्राण्यांमध्ये देखील विविधता पहायला मिळते. काही जीव पक्षांप्रमाणे स्वच्छंद असतात आणि काही झुरळां सारखे घाणेरडे. झुरळांचा विषय काढला गेला तर अनेक लोक आपली मान नकारात्मक दिशेने वळवतात. होय कारण झुरळे या संपूर्ण जगालाच त्रासदायक बनली आहेत.

झुरळ हा एक कीटक जाति मधील जीव आहे. उडता येण्यासाठी प्रकृतीने झुरळांना पंख बहाल केले आहेत. तसेच झुरळ एक लहान कीटक आहे. झुरळांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घातक घटकांमुळे डायरिया किंवा अन्नात विषबाधा होण्याची शक्यता असते. माणूस आणि इतर असंख्य प्राणी यांचे डोके धडापासून वेगळे झाले, की ते जागीच मरतात. झुरळे मात्र त्यांचे मुंडके तुटले तरी जवळपास एक महिनाभर जगू शकतात.

याचे कारण म्हणजे झुरळाच्या शरीरात रक्तदाबाची संकल्पनाच नसते. त्यामुळे डोके उडाल्याने त्याला काही फरक पडत नाही. तसेच एकदा अन्न खाल्ले, की झुरळाला ते जवळपास महिनाभर पुरते. त्यामुळेच डोके उडाल्यावर सुद्धा ते कित्येक दिवस जगू शकते. आपल्या घरात झुरळांना वावर करु देणे म्हणजे आजारांना समोरुन आमंत्रण देणे. झुरळांची समस्या आता प्रत्येक घरी एक सामान्य समस्या झाली आहे.

हे वाचा:   जर एखाद्या व्यक्तीने कच्चा पालक खाल्ला तर काय होते.! पालकला आयुर्वेद का म्हणते अमृत.? हे आजार कायमचे नष्ट करते.!

झुरळांच्या घरातील अस्तित्वाचा सगळ्यात जास्त धोका हा घरातील लहान मुलांना आहे. लहान मुले पडलेले काही ही तोंडात घालतात व त्याला झुरळांचा स्पर्श असेल तर ते किती भयानक असू शकते याचा विचार देखील तुम्ही करु शकत नाहीत. तुमच्या घरी देखील या झुरळांनी उपद्रव केला असेल तर तुम्ही आता काळजी सोडा व सुटकेचा निश्वास टाका. आज आमच्या या लेखा द्वारे आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत.

जो फक्त एकदा करा काही दिवसातच झुरळे तुमच्या घरातून स्वतःच पळ काढू लागतील. चला आता वेळ न घालवता लेखात पुढे हा उपाय पाहूया. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन घटक आवश्यक आहेत. बोरिक पावडर, गव्हाचे पीठ आणि साखर. हे तीन्ही समान प्रमाणात घ्या आणि पाण्याच्या मदतीने त्यांचे गोळे तयार करा. आता हे गोळे झुरळ असणाऱ्या भागावर ठेवा.

हे पीठाचे गोळे आणि साखरेचा वास लोभाने झुरळे खायला येतील परंतु एकत्रितपणे बोरिक पीठाचे सेवन करून ती म’रण पावतील. फक्त लक्षात ठेवा की आपण हे गोळे मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवले पाहिजेत. आपणास हवे असल्यास, आपण झुरळांच्या भागावर बोरिक पावडर देखील शिंपडू शकता. यामुळे देखील झुरळे पळून जातील. झुरळे बहुतेकदा भेगांमध्ये लपतात आणि आपल्या नजरेतून सुटतात.

हे वाचा:   या पानांचा असा करा उपयोग, शरीरा मध्ये एकही विषारी पदार्थ उरणार नाही; दहा दिवसांमध्ये वजन कमी होऊ लागेल.!

तसेच या ठिकाणी अंडी देतात. म्हणून स्वयंपाकघरात  पांढरे सिमेंट किंवा एमसीएलच्या मदतीने फर्निचर इ. मधील भेगा भरुन टाका. तसेच काकडीचे काही तुकडे करा आणि ज्या ठिकाणी झुरळे जास्त येतात तेथे ठेवा की ते त्याचा वास घेतील आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की काकडी हा एक असा खाद्य पदार्थ आहे जो बॅक्टेरियांच्या वाढीस बाधा आणतो. काकडीच्या मदतीने सुद्धा तुम्ही झुरळे नष्ट करु शकता.

हा एक साधा व सोपा घरगुती उपाय आहे त्यामूळे हा उपाय तयार करताना तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. बाजारात मिळणारी झुरळ मारण्याची उत्पादने केमिकल टाकून तयार केली जातात त्यांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम दिसून येतो. म्हणूनच आम्ही सांगितलेल हा नैसर्गिक व निर्धोक उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.