तुम्ही बघितले असेलच की भारतीय स्वयंपाक घरामध्ये प्रत्येक स्वयंपाक घरात प्रेशरकुकर हे असतेच. हे आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू बनवण्यासाठी चे खूप महत्त्वाचे भांडे आहे. प्रेशर कुकर चा वापर अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जात असतो. यामध्ये लोक गोड, तिखट तसेच वेगवेगळे पदार्थ बनवत असतात. अनेक लोक तर यामध्ये मांसाहाराचे पदार्थ देखील बनवतात.
साधरणतः अनेक लोक याचा वापर वरण भात बनवण्यासाठी जास्त प्रमाणात करत असतात. परंतु प्रेशर कुकर याचा वापर इतर अनेक कामासाठी केला जाऊ शकतो हे आपल्याला माहिती नसते. आपण नेहमी त्यामध्ये नेहमीच बनवत आलेलेच पदार्थ बनवत असतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला प्रेशरकुकर संबंधित असे काही ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्स नुसार जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर तुमचा भरपूर वेळ वाचेल तसेच तुमच्या गॅस मध्ये देखील बचत होईल. चला तर मग जाणून घेऊया.
एका प्रेशर कुकर मध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ शिजवू शकता. आपण एक पदार्थ बनवण्यासाठी एकदा प्रेशर कुकर वर ठेवून देतो. ज्यावेळी हा पदार्थ चांगल्या प्रकारे शिजतो त्यानंतर तो काढून घेऊन त्या जागी दुसरा पदार्थ टाकत असतो. परंतु असे करण्याऐवजी तुम्ही जर प्रेशरकुकरमध्ये सर्व पदार्थ एकत्र पद्धतीने ठेवले तर, यामुळे भरपूर वेळ देखील वाचेल. तसेच गॅस ची देखील बचत होईल. प्रेशर कुकरमध्ये हे पदार्थ वेगवेगळ्या वाट्यांमध्ये ठेवावे. हे अगदी सहजपणे केले जाऊ शकते व यामुळे गॅस तसेच वेळ दोन्ही वाचू शकते.
अनेकदा आपण कुकरमध्ये डाळ बनवत असतो अशावेळी आपल्याला एक समस्या नेहमी निर्माण होत असते की कुकरच्या सिटी तून काही पाणी बाहेर येऊ लागते. यामुळे सर्व किचन खूपच घाण होत असते. यामुळे हे थांबण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक्स करू शकतो. तुम्ही ज्यावेळी गॅसमध्ये दाळ टाकाल त्यामध्ये एक रिकामी वाटी ठेवावी. लक्षात ठेवा ही वाटी उलटी ठेवू नये. तर सरळ ठेवावी. जे एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व पाणी या वाटीमध्ये जमा झालेले दिसेल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.