आज-काल अनेक नवनवीन आजार निर्माण होत आहेत. वेगवेगळ्या आजारांशी लढण्यासाठी आपली इम्युनिटी पावर खूपच मजबूत असणे गरजेचे आहे. सध्या को’रो’णा सारखा मोठा आजाराशी लढण्यासाठी देखील रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते अशा लोकांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जाते.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती संबंधीची खूपच महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहोत. कशा प्रकारे तुम्ही एका टोमॅटोच्या सहाय्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता व अनेक आजारांपासून वाचू शकता हे आपण पाहणार आहोत. टोमॅटोचा हा उपाय केल्यास अनेक गंभीर आजारांपासून तुम्ही दूरच राहाल परंतु यामुळे तुमची इन्फिनिटी पावर देखील भरपूर वाढेल. यासाठी टोमॅटोचा ज्यूस खूपच फायदेशीर ठरेल.
टोमॅटो हे विटामिन सी चे खूप चांगले स्रोत आहे. टोमॅटो हे शरीरामध्ये अँटी एक्सीडेंट चे काम करत असते. टोमॅटो हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त मानले जातात. हेच कारण आहे की यामुळे अनेकदा डॉक्टरांकडून देखील वारंवार सांगण्यात येते की टोमॅटोचे जास्तीत जास्त सेवन करावे. आपल्या आहारामध्ये टोमॅटोचा समावेश करावा किंवा कच्च्या स्वरूपात देखील टोमॅटोचा समावेश केला जाऊ शकतो.
टोमॅटो ज्यूस बनवण्याची देखील एक पद्धत आहे आपण ती सविस्तरपणे पाहूया. यासाठी आपल्याला तीन वस्तूंची आवश्यकता भासेल. एक कप पानी, थोडेसे मीठ व एक मोठे टोमॅटो, टोमॅटो लहान असतील तर दोन घ्यावे. सर्वात प्रथम टोमॅटो पाण्याद्वारे चांगल्याप्रकारे स्वच्छ धुऊन काढावे. टोमॅटो धुतल्यानंतर त्याचे लहान लहान बारीक तुकडे करावे. त्यानंतर हे तुकडे ज्यूसर मध्ये टाकून याला चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यावे.
त्यानंतर हे मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घ्यावे. यावरून थोडेसे मीठ टाकावे. आता हे मिश्रण सेवन करण्यासाठी तयार आहे. आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा अशाप्रकारे करून पिल्यास रोगप्रतिकारकशक्ती मध्ये भरपूर वाढ झालेली दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.