याच्या एका थेंबात सुद्धा आहे खूप ताकद.! अशी एक डब्बी बनवून ठेवा आणि केसांना लावत जा.! केस नुसते वाढतच जातात.! पुरुष आणि महिला दोन्हींसाठी.!

आरोग्य

मित्रांनो आपले केस मजबूत, सुंदर, काळेभोर राहून केस गळू नये असे आपल्या पैकी सर्वांना वाटते यासाठी अत्यंत साधा सोपा उपाय घेऊन आली आहे. हा उपाय केल्याने कितीही केस गळत असतील तरीही १५ दिवसांतच तुमच्या केस गळतीच्या समस्या निघून जातील. तसेच याचा जर तुम्ही वारंवार वापर केला तर तुमचे जे अकाळी पांढरे झालेले केस आहेत तेसुद्धा काळेभोर, सुंदर, लांबसडक आणि चमकदार होण्यास मदत होईल.

त्याचप्रकारे केसांमध्ये जर कोंडा असेल तर कोंडा देखील निघून जातो आणि केसांना कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या निघून केस भरभरून वाढण्यास मदत होणार आहे. याचा वापर आपण लहान मुलांपासूम ते मोठ्यांपर्यंत सर्वांवर करू शकतो. हा खूप इफेक्टिव्ह आणि फायदेशीर उपाय आहे. मित्रांनो यासाठी प्रथम आपल्यला लागणार आहे कोरफड. कोरफड घेऊन ही प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे.

कोरफड घेताना हि जाड घ्यायची आहे अगदी कोवळी घ्यायची नाही. आता कोरफडीच्या दोन्ही बाजूंचे काटे कापून घ्या व मधोमध याला चिरून घ्यायचे आहे. आता मित्रांनो आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो आहे मेथीदाणे. आता हे मेथीदाणे आपल्याला मधोमध कापलेल्या कोरफडीमध्ये टाकायचे आहेत. यानंतर मेथीदाणे भरलेल्या कोरफडीचे थोडे मध्यम तुकडे करून ते धाग्याने किंवा दोरीने बांधून एका भांड्यात ठेवून द्यायचे आहे.

हे न बांधता तुम्ही नीट पॅक करून सुद्धा ठेवू शकता परंतु बांधून ठेवल्याने मेथीदाणे आणि कोरफड नीट मिक्स होऊन त्याचा जास्त इफेक्ट दिसेल. हे एका भांड्यात बंद ठेवून ज्या ठिकाणी जास्त हिट असेल तिथे हे भांडे ठेवून द्यायचे आहे. हे किमान १२ ते १५ तास असेच ठेवून द्यायचे आहे. या मेथीच्या दाण्यांना छान मोड आलेला असेल. आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे.

हे वाचा:   पुन्हा पुन्हा होणारी पाठ दुखी कायमची होईल बंद.! पाठदुखी चे हे असतात कारणे.! उतारवयात जाण्याआधी नक्की वाचा.!

हा उपाय अत्यंत पारंपरिक आणि जुनाट आहे या उपायामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. यानंतर आपल्याला येथे २ वाट्या भरून खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि ते एका भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर जे आपण कोरफड आणि मेथीच्या दाण्याचे मिक्सर मध्ये मिश्रण तयार केले आहे ते संपूर्ण या तेलामध्ये टाकायचे आहे. किमान अर्धा लिटर तेल या उपायासाठी वापरायचे आहे.

मंद आचेवर हे तेल उकळवून उकळवून तयार करायचे आहे. हे तयार करताना मंद आचेवरच करा म्हणजे छान ते तयार होते याचा अर्क संपूर्ण या तेलात छान उतरतो. जर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करत नसाल तर तुम्ही जे तेल वापरता केसांसाठी त्या तेलाचा देखील तुम्ही येथे वापर करू शकता. एलोवेरा जेल मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, कोलीन बी१,बी२,बी६ व बी१२ भरपूर प्रमाणात असत आणि म्हणूनच केसांचे आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी कोरफड अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

हे वाचा:   खाज, खरूज कायमची नष्ट करायची असेल तर एकदा करा आणि या विकारा पासून कायमची सुटका मिळवा.!

तसेच यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील निघून जातो, उष्णतेचा त्रास असेल, शांत वाटत नसेल तर या समस्या देखील निघून जातात. त्याचप्रमाणे मेथीच्या दाण्यांमध्ये देखील पोटॅशिअम, आयरेन, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी हि तंतू भरपूर प्रमाणात असतात आणि म्हणूनच केसांचे आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी मेथीचे दाणे अत्यंत उपयुक्त ठरतात.

मेथीच्या दाण्यांमुळे आपल्या केसांचा रंग टिकून राहतोच परंतु केस मजबूत, चमकदार, काळेभोर होऊन केसांना एक नैसर्गिक चमक येते व नैसर्गिकरित्या केस वाढण्यास देखील मदत होते. एवढा इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला या तेलामुळे मिळणार आहे. हे तेल छान गरम होऊन तयार झाले की हे गाळून घ्यायचे आहे. गाळून घेतलेल्या तेलाने आठवड्यातून किमान २ वेळेस तरी रात्री झोपण्यापूर्वी किंवा अंघोळी आधी घ्यावे.

जरी तुम्ही २ तास या तेलाने केसांना मसाज केली आणि मसाज करताना स्कॅल्प पासून ते केसांच्या टोकापर्यंत छान मसाज करायची आहे. या तेलाच्या वापराने नैसर्गिकरित्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.