हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूपच महत्त्व दिले गेले आहे. एकादशीच्या दिवसाला खूपच महत्त्वाचे मानले जाते या दिवशी लोक भगवंताचा उपवास करत असतात. प्रत्येक वर्षी मोठ्या एकादशी येत असतात ज्याचे विशिष्ट प्रकारचे वैशिष्ट्य असते. अनेक लोक एकादशीच्या दिवशी भगवंताची पूजा करत असतात तसेच दिवसभर देवाचे नामस्मरण करत असतात अनेक लोक तर उपवास देखील करतात.
प्रत्येक महिन्यामध्ये एकादस येत असते परंतु अशा काही एकादशी असतात ज्यांना विशिष्ट महत्त्व दिले जात असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एकादशीचे महत्व सांगणार असून एकादशीच्या दिवशी काय करावे तसेच काय करू नये हे देखील सांगणार आहे. कोणत्या गोष्टी करणे एकादशीच्या दिवशी शुभ किंवा अशुभ मानले जाते. चला तर मग या बाबत सविस्तर पणे माहिती पाहूया.
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजेच सूर्योदयाच्या पूर्वी उठून स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी. आंघोळ करत असताना देवाचे नामस्मरण करावे. असे करणे शुभ मानले जाते. आंघोळ केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावे व त्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे. सकाळच्या वेळी तसेच सायंकाळच्या वेळी तुळशी समोर एक तुपाचा दिवा लावावा. तुळशीचे पाया पडावे तसेच तुळशीच्या पराक्रमा कराव्यात.
घराच्या देवघरामध्ये जर भगवान विष्णूची मूर्ती असेल तर भगवान विष्णू समोर खीर, पिवळ्या रंगाची फळे तसेच मिठाई ठेवावी. या दिवशी दक्षिणावर्ती शंख मध्ये थोडेसे गंगाजल भरून याने भगवान विष्णू यांना अभिषेक घालावा. घराजवळ जर एखादे मंदिर असेल तर तेथे जाऊन गहू व तांदूळ याचे दान करावे. या दिवशी अशा प्रकारचे केलेले दान खूपच श्रेष्ठ मानले जाते. तसेच यामुळे घरांमध्ये सात्विक कार्य घडत असते.
या गोष्टी एकादशीच्या दिवशी करायला हव्यात. एकादशीच्या दिवशी अशाही काही गोष्टी आहेत ज्या कधीही केल्या नाही पाहिजे. एकादशीच्या दिवशी जे लोक उपवास करत असतात अशा लोकांनी या दिवशी कधीही राग येऊ देऊ नये. घरा मध्ये तसेच घराबाहेर कुणाशीही उगाचच वा’द-वि’वाद घालू नये. जर कुठे बाहेर वा’द-वि’वाद सुरू असेल तर तेथे जाणे देखील टाळावे सकाळच्या वेळी उशीरापर्यंत झोपू नये.
या दिवशी कधीही कुठल्याही प्रकारचे न’शा करू नये. तसेच या दिवशी चुकीचे कामे देखील करू नये. असे केल्याने एकादशीचे व्रत आपल्याला पावन होत नसते. या दिवशी खोटे देखील बोलू नये. अशा काही गोष्टी आहेत याचे तुम्ही सशक्तपणे पालन करावे. एकादशीच्या दिवशी या गोष्टी कधीही करू नयेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.