सर्दीमुळे ताप येणार नाही.! सर्दीचा त्रास होणार नाही.! आयुष्यात कधीही झाली सर्दी-ताप-थंडी तर पटकन करायचे हे एक काम.!

आरोग्य

आता पावसाचे दिवस आहेत आणि पावसाचे दिवस म्हटल्यावर सर्दी, खोकला, वायरल ताप या सर्व गोष्टी होत असतात असे आजार वरचेवर होत असतात कारण वातावरण नेहमी बदलत असते त्याचबरोबर आपण बाहेर पावसात अनेकदा भिजत असतो त्यामुळे आपण बराच वेळ ओले राहिल्यामुळे आपल्याला ताप येतो. अनेकदा सर्दी देखील होते आणि अशावेळी आपण डॉक्टर कडे जातो. डॉक्टरांचा सल्ला घेतो, त्यांच्याकडून औषधे देखील घेतो पण अनेकदा या गोळ्यांनी आपला ताप तर बरा होतो पण सर्दी व खोकला काही बरा होत नाही.

अनेकदा सर्दी देखील बरी होईल पण खोकला काही जात नाही, यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो.जसे की सिरप घेणे किंवा डॉक्टरांच्या गोळ्या घेणे यामुळे आपली सर्दी कधी कधी सूकते आणि त्याचा पुढे जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणूनच आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा वापर केल्यामुळे आपला खोकला या उपायाच्या एका वापराने बरा होईल, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय.

हा बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. हा उपाय बनविण्यासाठीची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे हे देखील जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला इथे एक कांदा घ्यायचा आहे. हा कांदा पांढरा कांदा असेल तर जास्त फायद्याचा ठरेल, कारण पांढऱ्या कांद्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात फायदा होत असतो. या कांदा मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर, अँटी ऑक्सिडंट आणि फ्लेव्होनॉइट हे औषधी गुणधर्म असतात.

हे वाचा:   डोळ्यावरचा चष्मा किती दिवस ठेवायचा.! कितीही असुंद्या मोती बिंदू.! या एका उपायाने दृष्टी परत येईल.!

जे क’र्क’रोगाशी लढण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करतात. याचा अर्थ असा नाही की लाल कांदा आपल्या शरीरासाठी फायदेशीर नसतो. जर आपल्याकडे पांढरा कांदा उपलब्ध नसेल तर आपण लाल कांद्याचा देखील वापर करू शकतो कारण लाल कांदा देखील औषधी गुणधर्मांनी भरलेलाच असतो आणि या कांदाचे देखील आपल्या शरीराला अनेक फायदे असतात. लाल कांद्यामध्ये सेलेनिअम भरपूर प्रमाणात असते.

ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती मजबूत राहते. आजारपणापासून दूर राहण्यासाठी कच्चा कांदा खाण्याचे फायदे अनेक आहेत. कांद्यामुळे आपले शरीर निर्जंतूक राहतेच शिवाय शरीराला हायड्रेट राहण्यास मदत होते म्हणून जेवढा पांढरा कांदा आपल्या शरीरासाठी फायदेशीर उपयोगी आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त लाल कांदा आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे पण इथे जर पांढरा कांदा उपलब्ध असेल तर आपल्याला पांढऱ्या कांद्याचा वापर करायचा आहे.

त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कांदा किसून घ्यायचा आहे व त्याचा रस काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला इथे त्याच्या रसाचा वापर करता येईल. जर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर लगेच कांदा कापून त्याचा वापर करायचा आहे कारण कांदा कापून ठेवून काही कालावधीनंतर त्याचा वापर केला तर तो तेवढा फायदेशीर ठरणार नाही म्हणून ताजा कांदा कापून लगेच त्याचा रस काढून घ्यायचा आहे. रस काढून झाल्यावर तो गाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे मध टाकायचे आहे.

हे वाचा:   पचनतंत्राला ठेवायचे असेल मजबूत, तर मग हे एवढे खाऊन बघा, पोटातला गॅस, ऍसिडिटी सर्व होईल गायब...!

कारण जेव्हा आपण मधाचे सेवन करू तेव्हा कोरडा खोकला असेल तर तो नाहीसा होईल पण मधाचा वापर जास्त करायचा नाही आहे. जर आपण चार ते पाच छोटे चमचे कांद्याचा रस घेत असून तर अर्धा चमचा मधाचा वापर करायचा आहे. एवढ्या प्रमाणातच आपल्याला मधाचा वापर करायचा आहे कारण इथे मुख्य भूमिका कांद्याची असणार आहे. कांदा जास्त फायदेशीर असल्यामुळे आपल्याला इथे कांद्याचा वापर करायचा आहे.

हे मिश्रण आपल्याला झोपण्यापूर्वी दोन ते तीन चमचे प्यायचे आहे किंवा सकाळी उठल्यानंतर देखील या उपायाचे सेवन आपण करू शकतो. जर दिवस भरातून तुम्हाला जास्त खोकला येत असेल जसे की दुपारी किंवा संध्याकाळी तर तेव्हा देखील आपण यामधील एक चमचा घेऊ शकतो याचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही उलट आपला खोकला लवकरात लवकर बरा होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.