तुम्ही हे तर पाहिलच असेल की जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा जेव्हा कधी तुम्हाला ताप किंवा सर्दी झालेली असेल तेव्हा आजी किंवा आई आपल्याला तांदळाचे पाणी पिण्यास देत असे. हे पिण्यासाठी आपल्याला अजिबात आवडत नसे परंतु तुम्हाला माहिती आहे का की हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले गेले आहे. हा एक आरोग्यासाठी चा केला गेलेला घरगुती उपाय आहे.
भारतीय खाद्य संस्कृती मध्ये ताटात भात असणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. तुम्ही पाहिलेच असेल की प्रत्येक घरांमध्ये थोडासा का होईना पण भात केला जात असतो. भाताची आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. भात बनवण्यासाठी जेव्हा आपण तांदूळ धूत असतो ते धूतलेले पाणी आपण फेकून देतो. परंतु भातापेक्षाही जास्त फायदे या पाण्याचे असल्याचे सांगितले जातात.
तांदळाच्या पाण्याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होत असतात. आजच्या या लेखामध्ये आपण हे सविस्तरपणे पाहूया. तांदळाचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी ऊर्जा देण्याचे काम करत असते. सकाळी उठल्यानंतर या पाण्याचे सेवन करणे म्हणजे एनर्जी बूस्ट करण्यासारखे आहे. तुम्ही गरम गरम तांदळाचे पाणी घेऊन यामध्ये थोडेसे स्वादानुसार मीठ टाकू शकता व याचे सेवन करू शकता.
तांदळाच्या पाण्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात. यामुळे मोटाबोलिसम आणखी वाढले जात असते याव्यतिरिक्त हे आपले पचन क्रिया देखील सुधारत असते. ज्या व्यक्तीला कफ ची समस्या आहे अशा व्यक्तीने तर तांदळाच्या पाण्याचे सेवन करायलाच हवे. लहान मुले असो किंवा मोठे डायरिया ची समस्या निर्माण झाल्यावर सर्वजण हैराण होत असतात.
या समस्येवर देखील तांदळाचे पाणी उपयुक्त आहे. डायरिया ची समस्या निर्माण झाल्यानंतर एक कप भर तांदळाच्या पाण्याचे सेवन करावे अगदी काही तासातच सर्व समस्या नष्ट होईल व तुम्हाला आराम वाटेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.