काही आजार असे असतात जे वर्षानुवर्ष कमी होण्याचे नावच घेत नसतात. अशाच पैकी एक आजार आहे तो म्हणजे चर्मरोग. चर्मरोग हा अतिशय भयंकर असा आजार असून यामुळे अतिशय वेदनादायक असा त्रास सहन करावा लागत असतो. यासाठी अनेक लोक दवाखान्यात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या औषध उपचार घेत असतात. अनेक त्वचारोगतज्ञ यावर ट्रीटमेंट देत असतात.
परंतु असे देखील काही घरगुती उपाय आहेत जे एकदा केले असता हे सर्व प्रकारचे विकार अगदी सहजपणे नष्ट होऊ शकतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अशाच प्रकारचा सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायाने तुमचा कितीही जुन्यातला जुना चर्मविकार असू द्या तो कायमचा जाईल. यामुळे गजकर्ण, खाज, खरुज यांपासून सुटका होत असते.
हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा असून सहजपणे घरगुती पद्धतीने केला जाऊ शकतो. या उपायासाठी अगदी कमी असे साहित्य लागणार आहेत हे साहित्य सर्व घरातच उपलब्ध असू शकते. हा उपाय केल्याने कितीही जुन्यातला जुना चर्मरोग असुद्या कायमचा गेलेलाच दिसेल. चला तर मग मग पाहूया कोणता आहे हा उपाय, कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय.
हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक छोटीसी पातेले गॅसवर ठेवायचे आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवावी. त्यानंतर या लहानशा पातेल्यामध्ये मोहरीचे थोडेसे तेल टाकावे. मोहरीचे तेल हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. तसेच त्वचेसाठी देखील याचा चांगल्या प्रकारे प्रभाव होत. जेव्हा हे तेल चांगल्या प्रकारे उकळले जाईल तोपर्यंत यामध्ये काही टाकायचे नाही.
जेव्हा हे चांगल्या प्रकारे उकळले जाईल तेव्हा यामध्ये कडूलिंबाचे पाने टाकावे. कडुलिंब यामध्ये अँटी फंगल व अँटी बॅक्टरियल गुणधर्म असतात. त्यामुळे या मिश्रणामध्ये कडूलिंबाचे काही पानेदेखील टाकायची आहे. या पानांना आपण तोपर्यंत उकळवत ठेवणार आहोत जोपर्यंत हे चांगल्या प्रकारे काळया रंगाचे होत नाही. जेव्हा हे चांगल्याप्रकारे उकळले जाईल तेव्हा गॅस बंद करुन टाकावा.
त्यानंतर हे मिश्रण गाळनी च्या साह्याने एका वाटीमध्ये काढून घ्यावे. या मिश्रणाला थोड्या वेळा करिता थंड होण्यास ठेवावे. कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी लावावी. दिवसभरातून कमीतकमी तीनदा हे मिश्रण लावावे. तसेच झोपण्या अगोदर देखील लावून सकाळच्या वेळी आंघोळी दरम्यान याला स्वच्छ धुऊन घेत जावे.
हा उपाय तुम्ही सात ते आठ दिवस करत राहिलात तर तुमच्या त्वचारोगावर नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.