दोन वर्षाच्या मुलीने गिळली रिमोट मधली बॅटरी, अवघ्या तासाभरातच गमवावा लागला या चिमुकलीला जीव.! संपूर्ण अन्ननलिका जळाली.!

आरोग्य

लहान मुले यांना कशाचीही भीती नसते तसेच त्यांना कुठल्याही गोष्टीची जाणीव नसते. खेळण्याचा नादात ते कधी काय करुन बसतील हे काही सांगता येत नसते. खेळता खेळता ते काय करतील हे सांगणे मुश्किलच आहे. मुलांना कुठलीही गोष्ट तोंडात घालण्याची सवय असते. याबाबतच्या अनेक घटना कानावर पडत असतात.

अनेक लहान मुले नाणी, एखादी छोटीशी वस्तू किंवा आपली खेळणी मिळत असतात अशा प्रकारच्या विविध घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारच्या वस्तू केवळ हे मुले तोंडातच नाहीतर नाकात सुद्धा घालत असतात व विविध समस्या निर्माण करून ठेवत असतात. त्यामुळे पालकांना तर त्रास होतोच तसेच त्यांच्या जिवाला देखील याचा त्रास होत असतो.

अशीच एक घटना इंग्लंड येथे घडली आहे. या चिमुकलीने चक्क रिमोटची बॅटरीच गिळली आहे. परंतु बॅटरी गिळल्यानंतर अवघ्या काही तासातच या मुलीचा मृ’त्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये राहणारी दोन वर्षाची हार्पर हिने टॉफी समजून रिमोटची बॅटरीच गिळली त्यानंतर तिची प्रकृती पूर्णपणे बिघडली. लगेच तिच्या पालकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले?

हे वाचा:   वाळलेल्या, सुकलेल्या, लुकड्या मुला-मुलांनी रोज खायला हवा हा एक पदार्थ.! वजन महिन्याभरात वाढत जाईल.!

तिच्या आईने याबाबतची दुःखद घटना, अंगावर शहारे आणणारी ही भयंकर घटना सांगितली आहे. तिच्या आईने सांगितले की नेहमीप्रमाणेच हार्पर तिच्या खोलीमध्ये काहीतरी खेळत होती. जेव्हा मी हे बघितलं की तिचे डोके हे आपोआप मागे जाऊ लागले आहे व तोंडातून अचानक पणे रक्त येत आहे तेव्हा मी पूर्णपणे घाबरून गेले. तिच्या तोंडातून काही आवाज निघत नव्हता तसेच तिला काही बोलता येत नव्हते हे पाहून आम्ही तात्काळ दवाखाना गाठला.

या लहानशा बॅटरी मुळे तिची पुर्ण अन्ननलिका जळाली होती या बॅटरीचा आत मध्ये जाळ झाला व यामुळे अन्ननलिकेत एक लहानसे छिद्र देखील पडले होते. उपचारादरम्यान मात्र या लहान मुलीचा मृ’त्यू झाला. लहानशी टॉफी समजून या मुलींनी ही बॅटरी गिळली होती. अनेकदा आपल्या मुलांकडे आपले योग्य ती लक्ष नसते त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असतात.

हे वाचा:   बरेच लोक कानात ह्या वस्तू घालून कानाचे नुकसान करतात.! कानात असलेला मळ फक्त तीनच मिनिटात बाहेर काढा.!

लहान मुलांकडे जागरूकपणे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. रिमोट किंवा बॅटरी मोबाईल यांपासून लहान मुलांना नेहमी दूरच ठेवावे. लहान लहान वस्तू शक्‍यतो दोन ते तीन वर्षाच्या मुला मुलींना घेण्यास देऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *