आपल्या घराच्या आजूबाजूला विविध प्रकारच्या वनस्पती असतात. परंतु आपल्याला त्याचे विविध होणारे फायदे माहिती नसते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका वनस्पती बाबतचे असेच काही फायदे सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला जी लिंबू वनस्पती आहे तिच्या पानांचे फायदे किती प्रकारे असतात हे सांगणार आहोत.
लिंबू तसे आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले गेले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की लिंबाच्या पानांमध्ये देखील भरपूर असे औषधी गुणधर्म असतात. यामुळे शरीराचे बरेचसे विकार नष्ट होत असतात. लिंबाच्या पानामध्ये सायट्रिक ऍसिड, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात.
यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन ची समस्या मुळापासून नष्ट होत असते. अशा प्रकारची समस्या तुम्हाला सतावत असेल तर तुम्ही लिंबाच्या पानांचा उपयोग करू शकता. अशा वेळी सर्वप्रथम दोन लिंबाचे पाने घ्यावीत त्याचा रस काढावा. या रसाला आपल्या तळहातावर घेऊन याचा वास घ्यावा. असे केल्याने डोकेदुखी तसेच मायग्रेनची समस्या कायमची जात असते.
अनेकदा पोटामध्ये जंतू निर्माण होत असतात ही समस्या खासकरून लहान मुलांना होत असते. जर तुम्हालाही ही समस्या असेल किंवा तुमच्या लहान मुलांना अशा प्रकारची समस्या असेल तर यासाठी लिंबाचे पाने खूपच उपयुक्त आहेत. यासाठी सर्वप्रथम लिंबाच्या पानांचा रस करून घ्यावा यामध्ये थोडासा मध टाकून याचे सेवन करावे.
तोंडावर अनेकदा विविध प्रकारचे डाग निर्माण होत असतात. अनेक प्रकारचे लहान-मोठे पिंपल्स देखील निर्माण होत असतात. चेहऱ्यावरील अशाप्रकारचे दाग धब्बे काढून टाकण्यासाठी याच्या अर्काचा उपयोग करायला हवा. अनेकदा शरीराच्या विविध समस्या निर्माण होत असतात. अनिद्रा, भीती वाटणे यांसारख्या समस्यांना कायमचे मुक्त करण्यासाठी लिंबाच्या पानांना उकळवून घ्यावे व याचे सेवन करावे.
त्वचा संबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी लिंबाच्या पानांचा रस उपयुक्त ठरू शकतो. गजकर्ण, खरूज नायटा अशा प्रकारच्या समस्या असेल तर यावर लिंबाच्या पानांचा उपयोग करायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.