मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपले आरोग्य हे वातावरणावर अवलंबून असते. थंडीचे दिवस सुरु होताच आपल्याला लसूणचे सेवन अवश्य केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. कधी, कस खाल्ले पाहिजे आणि किती प्रमाणात खावे ज्यामुळे तुम्हाला याचा भरपूर फायदा मिळेल. कोणी नाही खाल्लं पाहिजे हे देखील सांगू.
लसूण आपल्या जेवणातील पदार्थांची लज्जत तर वाढवतोच याशिवाय आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कच्या लसणाच्या सेवनाने शरीरातील अनेक आजार बरे होतात. अँटी बॅक्टरियल, अँटीव्हायरल, anti-inflammatory गुणधर्म असतात लसणात.
चर्मरोगात तेलात लसूण मिसळून लावल्याने आराम मिळतो. लसूण प्रकृतीने गरम असतो. वाढीच वय असलेल्यांनी (२०-३०वयवर्षे ) रोज दोन ते तीन पाकळ्या लसूण खाल्लेच पाहिजे. ४५+ असलेल्यांनी एक किंवा दोनच पाकळ्या खाव्या. वयानुसार पचनक्रिया मंदावते.
लसूण सोलून चावून गोळीप्रमाणे खाऊ शकता. यावर कोमटपाणी प्यावं. थंड पाणी अजिबात पिऊ नये. दोन तीन प्रकार सुचवत आहोत लसूण सेवणाचे. अनेक लोकांना लसणाचा उग्र वास आवडत नाही किंवा खाताना सहन होत नाही अशांनी लसूण ड्राय रोस्ट करावे. भाजून घेतल्याने लसूणचा वास कमी होतो. किंवा मधसोबत लसनाचे सेवन तुम्ही करू शकता.
लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरात गर्मी येते. छोट्या मोठ्या आजारात जसे छातीत कफ होणे, सर्दी, खोकला बाहेर पडतो यामुळे. दोन पाकळ्या बारीक कापून एक चमचा मधसोबत घेतले तर सोने पर सुहागा होईल. गॅस ऍसिडिटी अशा सर्व प्रकारच्या पोटाच्या तक्रारी देखील होतात ठीक. पोटातील जंत कृमी देखील मरतात.
रात्री झोपताना याचे सेवन करावे. उच्च रक्तदाब वाल्यानी देखील नक्की लसूण खाल्ला पाहिजे. लक्षात घ्या, कमी रक्तदाब असलेल्यांनी कच्या लसणाचे सेवन करू नये. हृदयरोगात तर संजीवनी आहे लसूण. चरबी नियंत्रणात राहते लसणाने. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात देखील फायदा होतो लसणाच्या सेवनाने.
दातदुखी वर लसूण वाटून काही वेळ लावल्यास दात दुखी ठीक होते. ज्यांना रक्त दाट असण्याची समस्या आहे, पातळ होत नाही त्यांनी लसूण नक्की खा. यामुळे रक्त गोठत नाही पातळ होते. आजकाल नस ब्लॉक होणे, रक्त गोठाणे या समस्या वाढत आहेत. याचा कोणताही साईडइफेक्ट नाही आपलं शरीर डिटॉक्स करते. कमी रक्तदाब आणि गरोदर महिला याचे सेवन करू नका.
लिव्हर कमजोर असलेल्यांनी, नुकतेच शस्त्रक्रिया झाली आहे अशांनी देखील कच्चा लसूण खाऊ नये. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.