अनेक वेळा आपल्या नाकावर ब्लॅक हेट्स निर्माण होत असतात. हे दिसायला देखील फारच विचित्र दिसत असते यामुळे आपली सुंदरता ही आणखी कमी होत असते. यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारचे सौंदर्यप्रसाधने उपलब्ध असतात परंतु अनेक वेळा याचे नुकसान देखील आपल्याला सहन करावे लागू शकते. परंतु काही घरगुती उपायाद्वारे यापासून कायमची सुटका मिळवता येते.
आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. हे काही उपाय जर तुम्ही केले तर तुम्ही नाकावर येणार्या ब्लॅक हेड्सच्या समस्या पासून कायमचे मुक्त व्हाल. घरगुती साहित्याद्वारे घरगुती पद्धतीने सोपे हे उपाय करायचे आहेत. याचा तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे साधे सोपे उपाय.
दह्याचा करा यावर सोपा उपाय: ज्या ठिकाणी ब्लॅक हेड्स आलेले आहेत त्या ठिकाणी मीठाच्या पाण्याने हलक्या हाताने मसाज करावी त्यानंतर यावर दही लावावे. दही लावत असताना सर्क्युलर पद्धतीने दही लावावे म्हणजे बोटांना गोल गोल फिरवत दही ने मालिश करावी. असे केल्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल.
मध आणि काळे मीठ असा करा वापर: मधाचा आणि काळा मिठाचा वापर यासाठी खूपच उत्तम रित्या केल्या जाऊ शकतो. यासाठी एक चमचा मधामध्ये अर्धा ते एक चमचा काळे मीठ एकत्र करून ब्लॅक हेड्स असलेल्या ठिकाणी लावावे. यामुळे एक्स्ट्रा डॅड स्किन ची समस्या देखील नष्ट होत असते. नाकावर जर खूपच तेल जमा होत असेल तर यासाठी देखील याचा वापर करू शकता.
लिंबू रसाचा करा असा वापर: ब्लॅक हेड्स असतील तर यासाठी लिंबूरस खूपच फायदेशीर मानला जातो. याच्या उपयोगाने तुम्ही ब्लॅकहेड्स पासून सुटका करू शकता. यासाठी अर्धा लिंबू घेऊन याच्या रसाने नाकाची मालीश करावी. यामध्ये तुम्ही थोडेसे काळे मीठ टाकून मालिश करू शकता यामुळे भरपूर फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.