काळ्या आणि पिवळ्या पडलेल्या दातांना किती दिवस लोकांना दाखवणार.! मोत्याहून सुंदर दात बनवा असे, अनेक लोकांना झाला आहे फायदा.!

आरोग्य

आपल्या मानवी शरीरातील सर्व अवयव महत्वाचे आहेत. आपले दात देखील खूप महत्वाचे आहेत. आपल्या पचन संस्थेतील पहिलाच अवयव म्हणजे दात. मुखातील कठीण व सामान्यतः अन्नाचे तुकडे तसेच चर्वण करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या भागास दात असे म्हणतात. अन्न चावण्या बरोबरच शब्द उच्चारणात देखील दात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच सुंदर निरोगी दात मानवी सौंदर्यातही भर घालतात.

आपण हसताना खेळताना आपले दात इतरांना दिसतात. दात स्वच्छ व पांढरे शुभ्र असतील तर दिसायला छान दिसतात. अनेक वेळा आपले दात हे काळे व पिवळे पडू लागतात. या मागे अनेक कारणे आहेत. बाहेरील जास्त अरबट सरबट व तेलकट व तिखट पदार्थ ग्रहण केल्यास दात खराब होतात. या सोबतच नियमित ब्रश न करणे अथवा चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्यास दात घासल्यास देखील दात पिवळे पडतात.

मात्र असे दात दिसयला खूपच वाईट दिसतात. यामुळे तोंडाचा देखील घाण वास येवू लागतो. पिवळ्या व काळ्या दातांमुळे आपले व्यक्तिमत्व पडून दिसते. अश्या वेळी आपण डेंटिस्ट कडे जावून दात साफ करवून घेतो. असे वारंवार दात साफ करुन घेणे दातांच्या मुळांना ठिसूळ व कमजोर बनवते. मित्रांनो ही समस्या लहान जरी वाटत असली तरी अनेक लोक आपल्या आस पास या तक्रारीने ग्रस्त झालेले दिसतात.

हे वाचा:   नको ती चरबी पाण्यासारखी वितळून जाईल.! पाण्यात या चार गोष्टी टाकून पील्याने पोट चरबी मुक्त होईल.!

या समस्येवर आता एक कायम स्वरुपी उपाय शोधणे गरजेचे आहे. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला असा एका घरगुती व नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. हा एक साधा सोपा पण रामबाण उपाय आहे घरगुती म्हणजे स्वयंपाक घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा उपाय तयार करु शकता. त्यामूळे हा जास्त खर्चिक देखील नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय.

आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात आले हे असतेच. आल्याचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. सर्दी खोकल्यावर आले अगदी सुरवाती पासून एक रामबाण उपाय आहे. शरीरातील आम्ल पित्त दूर करण्यासाठी आले उपयुक्त आहे. हेच बहुगुणी आले स्वच्छ धुवून घ्या नंतर याला बारीक चिरा मिक्सर मध्ये टाकून याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट छान गाळून घ्या. आता यात पुढे एक ते दोन चमचे मीठ घाला.

आपल्या दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी मीठ खूप आवश्यक आहे. मीठाने दात मजबूत होतात. आपण वापरतो त्या प्रत्येक पेस्ट मध्ये मीठ हे असतेच. म्हणूनच या उपायासाठी मीठ देखील घाला. पुढे या मिश्रणात तीस ते चाळीस मि.ली. लिंबाचा रस घाला. लिंबात जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असते. आपल्या दातांना पांढरे शुभ्र बनवण्यासाठी हा लिंबाचा रस खूप फायदेशीर आहे.

हे वाचा:   ऑफिस वरून किंवा शाळेतून आल्यानंतर सॉक्सचा खूपच घाण वास येतो.! आता एकच सॉक्स तुम्ही आठवडाभर वापरू शकता फक्त आल्यानंतर करायचे हे काम.!

म्हणूनच लिंबाचा रस देखील या उपायासाठी वापरायाचे आहे. शेवटचा घटक जो आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे तो म्हणजे तूथ पेस्ट. आपण जे नियमित तूथ पेस्ट वापरतो ते तूथ पेस्ट आपल्याला वापरायचे आहे. मात्र हे आयुर्वेदीक असेल तर अती उत्तम. आता हे सर्व घटक एका पात्रात नीट एकत्र करुन घ्या. यांना चांगले एकत्र ढवळून घ्या. नंतर पुढे रोज सकाळी उठून या मंजनाने दात घासा त्याच बरोबर रात्री झोपण्याच्या आधी देखील दात चांगले घासून काढा.

याच्या नियमित वापराने तुमचे दात पांढरे शुभ्र होतीलच सोबत दाताला कीड लागणार नाही दात मजबूत बनतील. हा एक नैसर्गिक व आयुर्वेदीक बेस असलेला उपाय आहे त्यामुळे याचा आपल्या दातांवर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.