घरामध्ये असे अनेक लहान-मोठे कीटक असतात जे आपल्याला खूपच भयंकर असा त्रास देत असतात. त्यातीलच काही कीटक म्हणजे मच्छर. मच्छर हा असा एक कीटक आहे जो आपल्याला त्रासच नाही तर अनेक भयंकर आजार देखील देत असतात. आपण या पासून कशाप्रकारे सुटका करायला हवी हे आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही सोपे असे घरगुती उपाय दाखवणार आहोत जे उपाय केल्याने तुम्ही मच्छरांपासून अगदी सहजपणे सुटका मिळवू शकता व आपले आरोग्य चांगले ठेवू शकता. मच्छर हे अनेक आजार पसरवित असतात. मच्छरांपासून स्वतःचे शरीर हे संरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊया कशाप्रकारे.
लिंबाच्या एका छोट्या उपायाने तुम्ही मच्छर यांना दूर करू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे व हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोनच गोष्टींची आवश्यकता भासणार आहे पहिली म्हणजे लिंबू व दुसरी गोष्ट म्हणजे लवंग. हे लिंबू कापून त्यात काही लवंगा खोसा आणि आपल्या बेडजवळ ठेवा. डास तुम्हाला चावणार नाहीत.
आपण झोपतेवेळी काही काळजी घेतली तर आपल्याला मच्छर चावणार नाही. झोपताना काही अशा वस्तू. काही असे पदार्थ आहेत जे शरीराला लावून झोपल्यास मच्छर शरीराजवळ येत नाही. मच्छर काही पदार्थांपासून खूप भीती वाटत असते. असे काही पदार्थ आहे ज्याचा गंध मच्छर ला आपल्या जवळ येऊ देत नाही. यासाठी झोपताना तुळशीच्या पानांचा रस, सोयाबीन तेल लावले तर डास तुम्हाला चावणार नाहीत.
नारळाचे तेल, कडुलिंबाचे तेल, लवंग तेल, पेपरमिंट तेल आणि नीलगिरीचे तेल समान प्रमाणात मिसळा आणि बाटलीत ठेवा. रात्री झोपताना त्वचेवर लावा आणि शांत झोपा. ही पद्धत बाजाराच्या क्रीमपेक्षाही जास्त प्रभावी आहे. हे काही सोपे उपाय वापरून तुम्ही मच्छरांपासून मुक्ती मिळवाल. यापैकी तुम्हाला कोणते उपाय योग्य वाटतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.