आजकाल अंगदुखी ही समस्या खूपच वाढत चालली आहे. साधारण वाटणारी ही समस्या अनेकदा त्रासदायक ठरते. अंगदुखी ही अनेकदा थकवा आल्यावर किंवा खूप जड काम केल्यावर होत असते. अशावेळी तुम्ही काही सोपे उपाय करायला हवे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला अंगदुखी च्या समस्या पासून आराम मिळेल.
हळदीचे दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहेत. यासाठी एक ग्लास दुध गरम केल्यानंतर थोडी हळद पावडर घालून मिक्स करा आणि नंतर त्याचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरातील वेदना कमी होऊ शकतात. हळदीचे दूध तुमच्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरते.
आले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे शरीरातील वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासाठी, आल्याचे काही तुकडे एक कप पाण्यात उकळून नंतर ते गाळून ते प्यावे. असे केल्याने शरीरातील दुखण्यापासून सुटका मिळू शकते.
आपले अनेक आजार बरे करण्याची ताकद ही मिठात असते. कारण मॅग्नेशियम सल्फेट मीठात आढळते. मीठ शरीराच्या दुखण्याला खूप आराम देते आणि सूज कमी करण्यास मदत करते. ज्या ठिकाणी तुम्हाला सूज आणि वेदना होतात त्या ठिकाणी मलमलच्या कपड्यात मीठ ठेवा आणि ते गरम करून तेथे लावा. यामुळे तुम्हाला भरपूर आराम मिळेल.
मोहरीच्या तेलाची मालिश केल्याने शरीरातील वेदना कमी होतात. असे केल्याने रक्त परिसंचरण चांगले होते, ज्यामुळे सूज कमी होते. यासाठी लसणाच्या दोन ते चार पाकळ्या थोड्या मोहरीच्या तेलात टाका आणि लसूण भाजून होईपर्यंत गरम करा. त्यानंतर हे तेल थंड करून मसाज करा. असे केल्याने तुम्हाला भरपूर आराम मिळेल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.