नमस्कार मित्रांनो आपल्या घरामध्ये अनेक लहान मोठे कीटक प्राणी असतात जे आपल्याला खूप त्रास देत असतात. असाच एक प्राणी आहे तो म्हणजे उंदीर. घरामध्ये उंदीर हे खूप प्रमाणात झाल्यास आपण खूप कंटाळून जात असतो. कारण उंदीर घराची नासाडी करत असतात. घरामध्ये काही कागद, पुस्तके असतील तर त्याचा पूर्णपणे फडशा उंदीर पाडत असतात.
तसेच घरामध्ये कपडे काही महत्त्वाच्या वस्तू देखील कुरतडत असतात. अशावेळी चिंता करण्याची काही गरज नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अतिशय सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या घरा मध्ये असलेले सर्व उंदीर बाहेर निघून जातील. तसेच त्यांचा पूर्णपणे खा’तमा होईल.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अतिशय कमी खर्च येणार आहे. परंतु उपाय करत असताना काही गोष्टींची काळजी तुम्हाला बाळगावी लागणार आहे. लहान मुलांपासून याची काळजी घ्यावी लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी लागणार आहे मॉस्किटो कॉइल. मच्छर पासून सुटका मिळवण्यासाठी मॉस्किटो कॉइल वापरली जाते. याच्या धुरामध्ये मच्छर घरात राहत नसतात.
विषारी असलेली ही कॉईल थोडीशी घ्यायची आहे. याला बारीक करून याची पावडर बनवायची आहे. लहान मुलांपासून ही शक्यतो दूर ठेवावी. कारण अतिशय विषारी असलेली ही कॉइल इजा पोहोचू शकते. याची थोडीशी पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यासाठी लागणार आहे शेंगदाणा कूट. शेंगदाणा कूट या मिश्रणामध्ये समप्रमाणात एकत्र करून घ्यावा.
त्यानंतर यामध्ये टाकावे ते गव्हाचे थोडेसे पीठ. यामध्ये आणखी एक पदार्थ आपल्याला लागणार आहे तो टाकावा तो म्हणजे कोलगेट. तुम्ही जे पण टूथपेस्ट वापरत असाल ती टूथपेस्ट यामध्ये टाकू शकता. या मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे या मध्ये थोडेसे पाणी टाकावे. अगदी थोडेसे कारण याची आपल्याला गोळी बनवायची आहे.
बनवलेली ही गोळी घराच्या कोपऱ्यामध्ये जेथे उंदरांचा सुळसुळाट आहेत तेथे ठेवावी. जेव्हापण उंदीर ही गोळी खाणार तेव्हा काही वेळातच उंदीर बाहेर निघून जाणार व जीव सोडणार. अशा प्रकारे हा छोटासा उपाय करून तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या उंदरांपासून सुटका मिळवू शकता. हा उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.
ही काळजी म्हणजे हा उपाय करत असताना ही गोळी तुम्ही घरांमध्ये ठेवणार आहात ती लहान मुलांच्या समोर येता कामा नये. कारण गोळी अतिशय विषारी असणार आहे. त्यामुळे एवढी काळजी तुम्ही घ्या. अशाप्रकारे तुम्ही घरामध्ये असलेले सर्व उंदीर बाहेर घालवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.