आपल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर आणि शरीरावर प्रायव्हेट पार्ट च्या ठिकाणी पातळ तर काही ठिकाणी जाड केस असतात. पण काही लोकांना शरीरावरील आणि चेहऱ्यावरील केस आवडत नाहीत. स्त्रियांना तर ही समस्या वारंवार फेस करावी लागते. हे केस काढण्यासाठी वॅक्सिंग (Waxing), शेविंग (shaving) किंवा थ्रेडिंगची (Threading) मदत घेतली जाते.
पण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमुळे त्वचेवर पुरळ उठणं, जळजळ होणं आदी समस्या उद्भवतात शिवाय त्वचा रुक्ष होते. या त्रासांपासून वाचण्यासाठी तुम्ही केस काढण्याच्या या घरगुती टिप्सचा अवलंब करू शकता. नको असलेले केस काढण्यासाठी असलेले हा घरगुती उपाय त्वचेला चमकदार देखील बनवण्यास तुमची मदत करतील.
हा उपाय तुम्ही काखेत, पायावर, चेहऱ्यावर, ओठांवर ट्राय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे, sodium bicarbonate, दोन चमचे बेकिंग सोडा, दोन चमचे ताज्या लिंबाचा रस, इत्यादी घटक. सर्वप्रथम दोन चमचे बेकिंग सोडा एका वाटीमध्ये घ्या. त्यानंतर अर्धे लिंबू कापून बिया काढून मोजून दोन चमचे लिंबाचा रस यामध्ये घाला.
चमच्याने मिश्रण हलवा. हे पाच मिनिटे असेच राहू द्या. नंतर यामध्ये एक चमचा नेहमीच्या खाण्यातील मीठ घाला. पुन्हा एकदा चमच्याने हे मिश्रण नीट हलवून घ्या. आता वरील मिश्रणामध्ये दोन चमचे पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट घाला. लक्षात घ्या रंग असलेले किंवा फ्लेवर टूथपेस्ट नको. चमच्याने हे मिश्रण चांगले फेटून घ्या. सुमारे दोन ते तीन मिनिटे फेटल्यानंतर आपले मिश्रण वापरण्यासाठी तयार होईल.
केसं असलेल्या भागावर हा प्रयोग करायचा आहे ती जागा सर्व प्रथम पाण्याने स्वच्छ करून घ्या. टॉवेलने अथवा टीश्यूने कोरडे करू नये तसेच पाणी वाळू द्यावे. केस काढण्याचा मूळ उद्देश त्वचा साफ करणे आहे. आता ही पेस्ट बोटाने ज्या जागेवर केस काढायचे आहेत त्या जागी लावा. ही पेस्ट लावून झाल्यावर सुमारे आठ मिनिटे थांबा.
त्यानंतर हे मिश्रण ओल्या स्वच्छ सुती कपड्याने केसांच्या मुळाच्या विरुद्ध दिशेने हलक्या हाताने दाबून पुसा. पुन्हा केसं वाढल्यावर हाच उपाय करा. तुम्हाला मऊसूत त्वचा मिळेल. याशिवाय त्वचावर कोणतेही डाग पडणार नाहीत. बाजारातील हेअर रीमुव्हल क्रीम मुळे त्वचेचे अतोनात नुकसान होते.
टिप्स : १. एक चमचा तुरटी पावडर आणि एक चमचा गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवून वरील उपाय केलेल्या जागी लावा आणि कोरडे झाल्यावर साध्या पाण्याने तो भाग स्वच्छ धुवा. २. महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि एन्ड्रोजनची वाढ सामान्य प्रमाणापेक्षा जास्त झाली की पुरुषांसारखे अंगावर केस वाढतात.
३. आपल्या शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन झाल्याने असे केसं अचानक वाढतात ते संतुलन राखण्यासाठी आहारात त्या पद्धतीने बदल करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.