बडीशेप खाण्या मागील हे सत्य तुम्हाला कोणीही सांगणार नाही, शरीरात होत असतात हे जबरदस्त बदल.!

आरोग्य

सलग तीन दिवस बडीशेप(fennel seeds/सौंफ ) खाल्ल्यानंतर याचे इतके फायदे होतील की तुम्ही विचारही करू शकत नाही. याचे गजब फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला किंवा आपल्या घरातील कोणालाही सांधेदुखी गुडघेदुखी असेल तर आठवड्यातील सलग तीन दिवस पुढील प्रयोग करावा. तीन दिवसांपेक्षा जास्त अधिक दिवस हा प्रयोग करू नये.

रात्री झोपताना एक ग्लास गाईच्या दुधामध्ये भाजून बारीक पावडर केलेल्या बडीशेप टाकायची आहे. ३-४ भिजवलेले बदाम अथवा अक्रोड या दूधासोबत आपल्याला सेवन करायचे आहे. १००% खात्रीशीर फरक पडतो. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारच्या वेदना यामध्ये फक्त औषध घेऊन परत पडणार नाही तर सोबतच तुमची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या पद्धती, व्यायाम या सर्वांची जोड आवश्यक असते.

रोजचे सूर्यनमस्कार आणि भूतशुद्धि हे केल्यास तुम्हाला वेदनेपासून लवकर मुक्ती मिळेल. ज्यांना मणका पाठ कंबर दुखीचा त्रास आहे त्यांनी साजूक तुपामध्ये शतावरी पावडर, भाजून बारीक केलेली बडीशेप ची पावडर याचे चाटण बनवून सेवन करावे. शरीरातील वंगन वाढवतात. लवचिकता वाढवतात. बडीशेप हे मुखशुद्धी म्हणून अत्यंत प्रभावशाली काम करते, हे आपल्याला पूर्वीपासूनच माहीत आहे.

स्वच्छ दात घासून सुद्धा बऱ्याच जणांना दुर्गंधीची समस्या असते अशा लोकांनी भोजन केल्यानंतर बडीशेप चे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे फक्त मुखशुद्धीच होते एवढेच नव्हे तर तुमची पचनक्रिया आहे सुधारते. मेटाबोलिजम रेट वाढतो. जेवण कमी करा खाल्लेला घास २०-२५ वेळा चावून बारीक करावा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. पोट साफ राहील.

हे वाचा:   हा उपाय केल्यानंतर एक केस जरी गळला तर बोला.! केसांची सगळी समस्या संपून जाईल.! घरगुती बिना खर्चाचा उपाय.!

बऱ्याचदा कमी अन्नग्रहण करून सुद्धा वजन वाढत राहते. यामागचे कारण स्पष्ट होत नाही. पण याचं खरं कारण असतं तुमचा मेटाबोलिजम रेट कमी असणे. पोटावरची चरबी वाढत राहते. आता आपण असा जबरदस्त उपाय पाहुयात की ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहील आणि मेटाबोलिजम रेट ही वाढेल. हा प्रयोग एक आठवड्यातील फक्त आणि फक्त तीनच दिवस करावा.

कमीत कमी आठ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी घ्या. ते कोमट करा. कच्च्या बडीशेपची पावडर बनवून ती अर्धा चमचा या पाण्यामध्ये घालावी. अर्ध्या लिंबाचा रस, एक ते दीड चमचा शुद्ध मध हे सर्व एकत्र करून सकाळी काहीही न खाता-पिता घ्यायचे आहे. मधुमेह असलेल्यानी मध घेऊ नका गुडघेदुखी-संधिवात असलेल्यांनी लिंबू स्किप करा. सुरवातीला कोणताही प्रयोग आठवड्यातील फक्त तीन दिवसच करा.

प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते. एकदा हा उपाय तुम्हाला लागू पडत आहे असे दिसल्यास तुम्ही तो रोजही करू शकता. हा उपाय तुमचे वजन नक्कीच कमी करेल. सोबतच तुम्हाला तुमचा डायेट चे ध्यान ठेवायचे आहे. जेवण चावून खा. गोड/तेलकट पदार्थ टाळा. बाकी सर्व गोष्टी खा पण प्रमाणात खा. आहारात फळे हिरव्या पालेभाज्या चालेल यांचे भरपूर प्रमाण वाढवा.

तंतुमय पदार्थ जास्त खा. प्रमाणात पाणी प्या. सूर्यनमस्कार हा एकच व्यायाम सर्व व्याधीन्वर खूप फायदेशीर आहे. मेटाबोलिजम रेट सुधारणे, चांगली झोप लागणे, हार्मोन्सचे संतुलन राखणे, चेहऱ्यावर ग्लो येणे, मानसिक आरोग्य, वाढते वय लपवण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

हे वाचा:   हा एक पदार्थ चिमूटभर घेऊन तुळशीच्या बुडाशी टाका तुळस बहरू लागेल, हिरवीगार तुळस हवी असेल तर करायलाच हवा हा उपाय.!

बडीशेप खाल्ल्यामुळे हाडं मजबूत होतात. हाडांची घनता वाढते. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर रक्त वाढवण्यासाठी मदत होते. रक्त पातळ करते. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, RBC(तांबड्या पेशी )वाढवणे, प्लेटलेटस ची कमतरता दूर करणे सोबतच पांढऱ्या पेशींचे संतुलन राखण्याचे काम हे नियमित बडीशेप सेवन केल्याचे फायदे आहेत. कमी पांढऱ्या पेशी मुळे शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता (इम्युनिटी) कमी होते.

ती वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही रोजच्या जीवनात जेवणानंतर बडीशेप चा वापर केलाच पाहिजे. प्रतिकारक्षमता आहे फक्त बडीशेप सेवन केल्यामुळेच वाढणार आहे असं नाही तर तुमचे हात-पाय मातीच्या संपर्कात आल्यामुळे हि रोग प्रतिकारक्षमता वाढेल. पाणी पायाने १-२ तास जमिनीवर चालणे महत्त्वाचे आहे. या सगळ्यामध्ये तुमचं मानसिक संतुलन आणि तुम्ही खुश असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे यासाठी तुम्ही रोज मेडिटेशन सुद्धा करा.

लहान मुलांना लक्षात न राहणे ही समस्या सर्रास दिसते. मेमरी पॉवर स्ट्रॉंग बनवण्यासाठी बडीशेप चा वापर केला जातो. लहान मुलांना जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप सोबत १-२ ग्रॅम गुळ खायला द्यावा. बडीशेप चे हे फायदे जाणून घेऊन ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तुम्ही या माहितीचा नक्कीच फायदा करून घ्याल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *