एकाच जागेवर का येतात पिंपल्स.! त्यामागचे लॉजिक जो समजून घेतो तो पिंपल्स येण्यापासून वाचतो.! आयुष्यभर पिंपल्स पासून दूर राहायचे असेल तर हे काम करावे लागेल.!

आरोग्य

आपला चेहरा आपली ओळख सांगतो. एक समान नावाची या जगात अनेक माणसे आहेत मात्र तुमच्या सारखा चेहरा फक्त आणि फक्त तुमचाच असतो. आज काल चेहर्याची निगा राखणे खूपच कठीण झाले आहे. होय आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे चेहर्याची त्वचा खूप खराब होत चालली आहे. मित्रांनो चेहर्यावर पूरळे व पिंपल्स येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. आज काल अनेक लोक या समस्येने त्रासले आहेत.

या समस्येवर आपल्या पैकी अनेक युवा कायमचा उपाय शोधत आहे. सर्व प्रथम जाणून घेवूया तुमच्या चेहर्यावर पूरळे व पिंपल्स उठण्याची कारणे कोण-कोणती आहेत. परीसरात वाढते प्रदूषण चेहरा खराब होण्याचे मुख्य करण आहे. आज वावरतो ती हवा देखील आता सुद्ध नाही त्यामुळे आजू बाजूची धूळ व सूक्ष्म जीव मिळून आपल्या चेहर्याला निस्तेज व काळपट बनवतात सोबतच चेहर्यावर पूरळे देखील येण्यास सुरवात होते.

याचे दुसरे कारण म्हणजे चुकीचे खाण-पाण होय तुम्ही जे अन्न ग्रहण करता त्यात योग्य पोषक तत्व नसतील आपल्या त्वचेसाठी लागणारे योग्य घटक नसतील तर असे अन्न काही फायद्याचे नाही. तेलकट व स्निग्ध पदार्थ तसेच दूधापासून तयार झालेले पदार्थ जास्त प्रमाणात ग्रहण केल्याने ही समस्या उद्भवू शकते. तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल आणि एक कायमचा उपाय यावर शोधत असाल तर आता सुटकेचा श्वास घ्या.

हे वाचा:   तोंड काळं पडल म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही.! कुठल्याही फंक्शन च्या आदल्या दिवशी लिंबू घेऊन करायचे एवढे एक काम.!

आज आम्ही खास तुमच्यासाठी या लेखाद्वारे चेहर्यावरची पूरळे व पिंपल्स काही दिवसातच दूर होतील तुमचा चेहरा तेजस्वी व तरोताजा दिसू लागेल. या उपाय जो आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत तो पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे व घरगुती आहे. घरातील काही सामग्री वापरुन हा उपाय तुम्ही सहज तयार करु शकता. चेहर्याच्या त्वचेसाठी हा एक रामबाण उपाय आहे. चला तर वेळ न दवडता पाहूया हा उपाय.

मित्रांनो चेहर्यावर पूरळे हे आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी आहे याचा संकेत दर्शवते त्यामुळेच आपल्या शरीराला प्रत्येक दिवशी तीन ते चार लिटर पाणी हे मिळणे आवश्यक आहे. त्याच बरोबर ताज्या फळभाज्या व फले देखील रोज ग्रहण करा. फळांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते याने आपले अन्न योग्य वेळी पचन होते व जेवणातील सर्व पोषक घटक शरीराला मिळतात.

त्याच बरोबर ताज्या भाज्या खाल्याने शरीरात र’क्त शुद्धी करणाची प्रक्रिया जलद होण्यास मदत होते. म्हणून रोज आहारात किमान एक फळभाजी समाविष्ट करावी. कोरफड या वनस्पतीला तुम्ही सर्व ओळखतच असाल. आपल्या मानवी शरीरासाठी ही कोरफड खूप उपयुक्त आहे. आपल्या केसांसाठी, पचन तंत्रासाठी तसेच त्वचेसाठी ही कोरफड खूप फायदेशीर आहे. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम ताज्या कोरफडीचा रस घ्या.

हे वाचा:   वैवाहिक जोडप्यांनी नक्की वाचा.! वैवाहिक आयुष्य आणखी सुंदर बनेल.! घरगुती उपाय आणि पद्घती.!

दुसरा घटक जो तुम्हाला हा उपाय तयार करण्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा रस शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी लिंबू खूप उपयुक्त आहे. आता कोरफडीचा रस आणि लिंबाचा रस या दोन्ही घटकांना एकत्र करुन त्याचे एक मिश्रण तयार करा व रोज रात्री झोपताना आपल्या चेहर्याच्या त्वचेला लावा व सकाळी कोमट पाण्याने धुवून टाका.

काही दिवसातच तुम्हाला तुमची त्वचा चमकदार व तेजस्वी दिसू लागले चेहर्यावर असणारे पिंपल्स व पूरळे कायमचे निघून जातील. बाजारातील केमिकल असणारी उत्पादने वापरणे आता बंद करा व आम्ही सांगितलेल हा नैसर्गिक उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.