मरेपर्यंत कंबर दुखी होणार नाही, सांधे दुखी आणि कंबर दुखी पासून मिळेल कायमची सुटका.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आम्ही नेहमी तुमच्या साठी नवीन नवीन माहिती आणत असतो. आज आपण जडीबुटी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती दिसायला अत्यंत वेगळी आहे. ही जडीबुटी भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते. लहानपणी तुम्ही यांच्यासोबत खेळला असाल, हे कपड्यांवर मारले असतात ते कपड्याला चिटकते. या जंगली जडीबुटी चे नाव आहे छोटा धतुरा./छोटा गोखरू (Siberian cocluber) किंवा सराटा! नदीकिनारी, जंगलात किंवा शेतात ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते.

आयुर्वेदानुसार या वनस्पतीच्या गोंड्या मध्ये ज्वरनाशक, पित्तनाशक,उष्णता नाशक हे गुण असतात. शीतल प्रवृत्तीचे असे हे फळ असते. रोगनिवारण, वेदनाशमन, शक्तीवर्धक असे वेगवेगळ्या प्रकारासाठी वनस्पतीचे सुद्धा निरनिराळे भाग जसे पान, खोड, मुळं यांनी अर्क, काढा, लेप, चूर्ण, गुटीका, आसवे असे बनवले जाते.

मूत्रपिंड संबंधित आजारावर २५०ग्रॅम गोखरू चे फळ घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी घेऊन ते पाणी १ लिटर होईपर्यंत उकळून घ्यावे. थंड झाल्यावर काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे. चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, रिकाम्या पोटी त्यापैकी १०० मिली पाणी कोमट करून प्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये.

हे वाचा:   जे लोक उशिरापर्यंत जागरण करतात त्यांनी नक्की वाचा.! उशिरा झोपणाऱ्या लोकांच्या मेंदूचे होत असतात असे हाल.!

गोक्षुराद्यवलेह, गोक्षुरादिगुग्गु्ळ, अश्मरीहर कषाय, गोखरूपाक, लघुपंचमूळ, दशमूळकाढा, वगैरे औषधे ही गोखरू पासून बनवलेली व बाजारात सहजरित्या उपलब्ध असणारी आहेत. अन्न अपचन, भाजणे, हातपाय लचकणे, सूज, कापणे, खरचटणे असे अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींपासून ते प्रजनन क्षमता -बाळबाळंतिणीची काळजी संगोपन व उपचार यात सुद्धा अजूनही आयुर्वेदाचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

कंबरदुखी, अंगदुखी यावर सुद्धा गोखरूची सुकी भाजी खाणे हा उत्तम उपाय आहे. जुनाट डोकेदुखी, पोटात सतत जंत होणे, त्वचेचे विकार (गजकर्ण/ खाज /नायटा ) यावर गोखरू वरदान आहे.
लैंगिक दुर्बलतेत गोखरू व तिळाचे चूर्ण मध व बकरीच्या दुधातून देतात. धातूपुष्टतेसाठी गोखरू, गुळवेल आणि आवळे समभाग घेऊन त्याचे चूर्ण दुधातून द्यावे.

गर्भस्थापक, शीतवीर्य असूनही वातपित्तशामक आहे.मधुमेहात गोक्षुरादि गुग्गुळ तीन गोळय़ा व रसायन चूर्ण एक चमचा बारीक करून घेतल्यास मूत्रपिंडच सक्षम होते. लोहाची कमी दूर करते. उच्च रक्तदाब असल्यास आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि गुग्गुळ व रसायन चूर्ण घ्यावे .एक ना अनेक अशा तब्बल कमीत कमी २५ आजारांवर ही वनस्पती प्रभावतेने काम करते.

हे वाचा:   उसाचा रस शरीरात गेल्यावर शरीरात काय होते.? माहिती आहे का.? गारेगार उसाचा रस पीत असाल तर एकदा नक्की वाचा.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *