या बहुमूल्य वनस्पतीला लोक गवत समजण्याची चूक करून बसतात, याचे जबरदस्त फायदे एकदा जाणुनच घ्या.!

आरोग्य

मित्रांनो, भारतातील हवामानच असे असे आहे की ज्यामुळे निसर्गात आपोआपच तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती गवत उगवते. तुम्ही पाहिला असेल तर पावसाळ्यात निरनिराळ्या वनस्पती गवत हे रस्त्याच्या कडेला आपल्या घराजवळ कोठेही उगवतात. त्यातील काही वनस्पतींचा उपयोग हजारो वर्षांपूर्वी जडीबुटी मध्ये केला जात असे. परंतु माहितीचा अभाव असल्याने आपण बऱ्याच औषधी वनस्पतींना गवत समजतो.

आज आपण ज्या वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत त्याचे नाव आहे कांचनार / कांचन. याला रक्तकांचन असे ही नाव आहे. हिंदीत कचनाल असे म्हणतात. या वनस्पतींची शेती नसते. खूप कमी लोकं या वनस्पतीला नावाने ओळखतात. रिकामी जमीन, रस्त्याच्या कडेला, पाण्याच्या जवळ ही वनस्पती सहज आढळते. याला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे आहेत.

संपूर्ण भारतात ही वनस्पती आढळते. या वनस्पतीत असंख्य फायदे आहेत. ही वनस्पती अँटीबॅक्टरियल चे काम करते. जर खाज खरूज नायटा असेल तर ही वनस्पती उपयुक्त आहे. लघवी करताना त्रास होत असेल किंवा मुतखड्याचा त्रास असेल तर ही वनस्पती वरदान आहे. गॅस एसिडिटी दूर करण्यासाठीही या वनस्पतीचा उपयोग होतो. काही ठिकाणी याच्या पानांची भाजी बनवून खातात.

हे वाचा:   वाळलेल्या तुळशीच्या बुडाशी टाका हा एक चमचा.! सातच दिवसात तुळस हिरवीगार होईल.!

गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता यापैकी समस्या असेल तर या वनस्पतीची पंधरा ते वीस पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. पान कुटून रस बनवा. असा अर्धा चमचा रस कोमट पाण्यासोबत घेतल्याने गॅस एसिडिटी मध्ये लाभ होतो. पोटाच्या अपचनाच्या सर्व तक्रारी दूर होतात. जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने हा प्रयोग करा.

तुम्ही मूळव्याधीने त्रस्त असाल तर या वनस्पती च्या पानांचा रस मूळव्याधीच्या कोंबवर लावल्याने त्यातून होणारा त्रास थांबतो. रक्त पडणे थांबते. जखम झाल्याने बरं पडले असतील किंवा दुखापतीमुळे जखम झाली असेल तर त्या जागी हे अँटीसेप्टीक प्रमाणे काम करते. त्यासाठी तुम्हाला वनस्पतीची पाने तोडत असताना त्यातून निघणारा रस आहे तो जखमेवर लावायचा आहे. तुम्हाला आराम मिळेल.

खूप खाज येणे /गाऊट /नायटा समस्या असेल तर या वनस्पतीच्या पानांचा रसाचा लेप बनवून त्या भागावर लावल्याने खाज खुजली मिटेल. जर तुम्हाला लघवी करताना दुखत असेल किंवा मुतखड्याचा त्रास असेल तर तुम्ही कंचर चा उपयोग करू शकता. यासाठी रोज ताजी दोन ते पाच ग्रॅम पान घेऊन, रस बनवून, पाण्यासोबत घ्यावे. यामुळे मुतखड्याची समस्या संपेल.

हे वाचा:   सोन्याहूनही किमतीची आहे ही एक वनस्पती, दिसेल तिथून घरी आना ही आयुर्वेदिक वनस्पती.!

गोवर कांजण्या यांसारख्या रोगामुळे शरीरात उष्णता भडकते. यावर या कंचर वनस्पतीच्या पानांचा काढा पिल्याने शरीरातील दाह कमी होतो. शरीरात गाठी झाल्या असल्यास त्यावर कांचनार या वनस्पतीच्या पानांचा लेप ताकात उगाळून लावावे. ही वनस्पती कफ आणि पित्त नाशक आहे. आयुर्वेदिक दुकानांमध्ये कंचनार गुग्गुळ अनेक प्रकारच्या रोगांवरती उपलब्ध आहे.

या अनोख्या वनस्पती बद्दल जाणून घेऊन तुम्हाला नक्कीच विशेष वाटलं असेल. आम्हाला आनंद होत आहे आम्ही तुमच्या माहिती संग्रहात भर टाकत आहेत. ही अनोखी माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करावी.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *