हाडांची कमजोरी, म्हातारपण, थकवा येणे, रक्ताची कमतरता, कॅल्शियमची कमी नव्वदी पर्यंत होणार नाही…!

आरोग्य

मित्रांनो, आज-काल जवळजवळ सगळ्याच व्यक्ती सांधे दुखीमुळे त्रस्त आहेत. आणि हे दुखणे वाढतच जाते. पहिल्यांदा एक विशिष्ट वयातच हे दुखणे उगवायचे पण आजकाल कमी वयातच गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठ दुखी, स्नायू दुखी या समस्या बघायला मिळतात. यावर एक आयुर्वेदिक उपाय आम्ही तुमच्या सोबत आज शेअर करत आहोत. शुद्ध चांगल्या प्रतीचे हुळकुंड घ्या त्याची घरीच हळद बनवा.

एकच चमचा हळद घ्या.( तयार चांगली हळद घेतली तरीही चालेल ). हळदीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. हळद आपल्याला अनेक रोगांपासून वाचवते. खाण्यामध्ये स्वाद आणि रंग देण्यासोबतच सांधेदुखी गुडघेदुखी यामध्ये हळद अत्यंत गुणकारी आहे. सूजेवर तर हळद म्हणजे संजीवनी च होय. नैसर्गिक पेन किलर असते हळद.

सुंठ : वाळलेले आले / उपलब्ध नसल्यास ताजे आले घेतले तरीही चालेल. थंडीमध्ये आल्याचे सेवन तुम्ही नक्की केले पाहिजे. सुंठी पावडर रेडीमेड बाजारात उपलब्ध असते. दर्द निवारक असलेली ही पावडर सांधेदुखीवर अत्यंत उपायकारी आहे. वात विकार दूर करून सूज कमी करते सुंठ. शरीरातील कमजोरी दूर करून जॉईंट पेन कमी करते. सर्दी, खोकला, छाती जमलेला कफ बाहेर काढते सुंठीची पावडर. पचन प्रक्रिया साठी वरदान आहे ही पावडर. इम्युनिटी पावर वाढवते. सुंठी पावडर घ्या.

हे वाचा:   एका लसणाने महिन्याभरात पाच किलो वजन कमी केले.! वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी लसूण आहे एक वरदान.! फक्त कसे खायचे हे नक्की वाचा.!

लवंग : लवंग मध्ये मध्ये दुखणं निवारक गुण असतात. सर्दी, खोकला, कफ,अंगदुखी यामध्ये आराम देणारी हि लवंग आपली इम्युनिटी पावर वाढवते. वात,कफ आणि पित्त विकारात लवंग खूप फायदेशीर असते. मध्यम आकाराच्या तीन ते चार लवंगा घ्या. त्याला खलबत्त्यात भरड कुटावे.

एक मोठा ग्लास दूध घ्या. रोज रात्री झोपताना एक ग्लास दूध पिल्याने तुमच सर्व दुखणे दूर होईल. गुडघेदुखी, सांधे दुखी याचा ज्यांना त्रास आहे त्यांनी फ्रीजमधील थंड वस्तूंचे सेवन करू नये. सोबतच आंबट वस्तूंचे सेवन ही करू नये. साखरेऐवजी गुळाचा प्रयोग करा. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस जास्त असते. जे आपल्या हाडांना बळकटी देते. मधुमेह असलेल्यानी गुळाचे सेवन करू नये.

एक ग्लास दूध भांड्यात घेऊन गरम करायला ठेवावे त्यात ओबड-धोबड कुठल्या लवंगांची पावडर टाकावी. सोबतच पाव चमचा हळद, पाव चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा गूळ यात घाला. आणि हे दूध उकळावे. हे गरम दूध रात्री झोपायच्या अर्धा तास आधी घ्या. असं सलग पंधरा दिवस केल्याने तुम्हाला एकदम फरक जाणवेल. नैसर्गिकरीत्या आपल्या रोगांवर उपाय करण्याचे तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे.

हे वाचा:   तुमच्या बुटक्या मुलांना ही एक गोष्ट उंच बनवू शकते.!मुलांची उंची वाढवणे आहे आईच्या हातात.! एकदा नक्की वाचा.!

तेल मालीश साठी: गुडघे दुखी, सांधेदुखीसाठी एक तेल कसे बनवायचे आपण पाहूयात. हाडांना वंगण हवे असते. तीळ/मोहरीचे तेल घ्या. त्यात एक चमचा ओवा घाला. नंतर 20 पाकळ्या लसूण घाला. हे तेल जास्त बनवून सुद्धा तुम्ही साठवू शकता. हे मिश्रण सुमारे दोन ते तीन तास उन्हात ठेवून गाळून घ्या. एका बाटलीत भरून ठेवा. सकाळ संध्याकाळ या तेलाने हलक्या हाताने सांध्यांवर, गुडघ्यावर, जिथे दुखत आहे तिथे मालिश करा. तुम्हाला आराम मिळेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *