या काही वस्तू फ्रिज मध्ये ठेवण्याची चूक करू नका, अन्यथा आरोग्याला निर्माण होईल खूप मोठा धोका.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासोबत अत्यंत महत्त्वाच्या अशा स्वयंपाक घरातील टिप्स शेअर करणार आहोत. आपण बाजारातून काही खरेदी केल्यावर ते फळे भाजीपाला लगेचच फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामागे आपला असा विचार असतो की फ्रिज मध्ये ठेवल्यावर वस्तू ताज्या राहतील. आणि एक-दोन दिवस आरामात चालतील.

पण असं होत नाही तुम्ही बारकाईने पाहिले असता फ्रीजमध्ये ठेवल्या नंतरही काही वस्तू खराब होतात असे तुमच्या निदर्शनास येत असेल. काही वस्तू अशा असतात ज्यांना कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. जस की ब्रेड. दोन ते तीन दिवसाच्या आत (एक्सपायरी डेट पाहून) ब्रेड संपवायला हवा. एका प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळून ब्रेड फ्रीजर मध्ये ठेवावा असं केल्यामुळे त्यातील आर्द्रता टिकून राहील.

ब्रेड सुकणार नाहीत. लिंबू (सायट्रिक ऍसिड असणारे कोणतेही फळ) फ्रिजमध्ये कधीही ठेवू नये. हे पदार्थ नेहमी नॉर्मल तापमानावरती बाहेरच ठेवावेत. बटाटे : बटाटे घरातील कोणत्याही थंड अशा जागी ठेवले तर ते खराब होणार नाहीत. बटाटे फ्रिज मध्ये ठेवले असता, बटाट्या मधील स्टार्च चे साखरेमध्ये रूपांतरित होते आणि त्याची चव आणि पौष्टिक गुणधर्म खराब होतात.

हे वाचा:   आजीबाईचे हे प्रभावी घरगुती उपचार; तुम्हाला अनेक आजारांपासून ठेवतील कायम दूर.!

टोमॅटो फ्रिज मध्ये ठेवू नये. टोमॅटो जास्त थंड वातावरण सहन करू शकत नाहीत आणि ते खराब होतात. केळी सुद्धा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. फ्रिजमध्ये ठेवलेली केळी लवकर काळी पडतात. त्याच्या आसपास जे कोणते फळ असेल तेही जास्त पिकायला सुरुवात होते. केळाचे देठ इथालियन गॅस सोडते. जे फळ लवकर पिकवण्यात मदत करते.

केळाच्या देठावर प्लास्टिक गुंडाळून केळी स्वतंत्रपणे वेगळेच बाहेरच्या नॉर्मल तापमानावर ठेवावीत. सफरचंद महाग असतात. टिकवण्यासाठी आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. सफरचंदाला कागदामध्ये गुंडाळून फ्रिजमधील भाजी ठेवण्याचा रॅकमध्ये ठेवावे. त्या प्रकारे तुम्ही कुठलेही बी असलेले फळ ठेवू शकता.

खीरा, खरबूज,कलिंगड सारख्या गोष्टींमध्ये अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असते. फ्रीजच्या थंडीमुळे हे खराब होते. त्यातील पौष्टिक तत्व निघून जातात. त्यामुळे ही फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. आपल्याला थंड फळे खायचे असल्यास खाण्याआधी अर्धा तासच फ्रीजमध्ये ठेवावेत.

हे वाचा:   फक्त एकदा खा.! आखडलेल्या नसा, सांधे पूर्ण होईल मोकळे.! थकलेला वृद्ध पण पळू लागेल.! जुनाट रोग होतील गायब.!

कांदा.. आपल्याला असं वाटतं कांद्याला येणार्‍या वासामुळे आपण ते फ्रीजमध्ये ठेवत नाहीत. परंतु फ्रिजमध्ये कांदा ठेवल्यामुळे तो लवकर सडतो. कांदा बटाटा सोबत कधीच ठेवू नये. लसुण.. लसुण फ्रीजमध्ये ठेवले असता त्याला कोंब फुटतात आणि लसूण लवकर खराब होतो. केचप आणि सोया सॉस फ्रीजमध्ये ठेवले असता त्यातील पोषकतत्व कमी होऊन चव बदलते.

फ्रिजमध्ये या वस्तू ठेवले असता खराब तर होतातच परंतु आपल्या आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. पैसे ही वाया जातात. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या जवळच्या मित्रांसोबत ही माहिती तुम्ही नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *