कस्तुरी नेमके असते तरी काय.? ती मिळते कुठे.? एक कोटी रुपये मिळतात का त्याचे.? याबद्दल माहिती वाचून थक्क व्हाल तुम्ही.!

आरोग्य

आपल्या आस पास निसर्ग आहे. हा निसर्ग एक खूप मोठा किमयागार आहे. याने आपली ही जादू या परिसरातील सर्व छोट्या मोठ्या सजीवांवर केली आहे. यातीलच एक नैसर्गिक चमत्कार म्हणजे मृगाच्या पोटातील कस्तुरी. हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला देखील असाल. मात्र फार कमी लोकांनी याला पाहिले असेल आणि त्याच बरोबर मोजक्याच लोकांना या बाबत संपूर्ण माहिती देखील आहे.

आजच्या आपल्या या लेखात आम्ही याच कस्तुरी बाबत काही गुपिते तुमच्या समोर उलगडणार आहोत. तर हा लेख अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. मित्रांनो कस्तुरी ही कस्तुरीमृग प्रकारच्या हरीणाच्या नाभी पासून म्हणजेच पित्ताशयतून उत्पन्न होणारा सुवासाचा एक सुगंधी पदार्थ आहे. याशिवाय या प्रकारचा वास अनेक वनस्पतींपासून तसेच कृत्रिम पद्धतीने देखील मिळवला जातो. मात्र जो सुवास खर्या कस्तुरी मध्ये आहे ती तुम्हाला जगभरात कुठेच मिळणार नाही.

काही हरणे आपल्या कुळातील मोशस या एकमेव प्रजातीचे युग्म खुरी प्राणी आहेत. सारंगाद्य म्हणजे सर्व्हिडी कुळातील प्राण्यांपेक्षा म्हणजे खऱ्या हरणांपेक्षा कस्तुरी मृग अधिक पुरातन असून यांना सारंगाद्यांप्रमाणे शिंगे नसतात, तसेच स्त’नाग्रांची एकच जोडी असते. तसेच यांना पित्ताशय, तसेच सुळ्यांसारखे दोन दात असतात; जे सारंगाद्यांमध्ये आढळत नाहीत.

हे वाचा:   या तीन वाईट सवयीमुळे मेंदू होत असतो आणखी कमजोर; आजच्या आज सोडून द्या ह्या तीन वाईट सवयी.!

तसेच यांना कस्तुरी नावाचा तीव्र वादाचा स्राव स्रवणाऱ्या कस्तुरी ग्रंथी असतात.कस्तुरी मृगांची लांबी अंदाजे ८० ते १०० सेमी असते,त्यांची खांद्या पर्यंत अंदाजे ५० सेमी असते.त्यांचे लांब टोकदार मधले खुर व मोठे पार्श्व खुर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जम बसवण्यासाठी विकसित झाले आहेत.कस्तुरी ग्रंथी नरांमध्ये, पोटाच्या त्वचेखाली, जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते.

नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो. या कस्तुरीचा रंग विविध प्रकारचा असू शकतो. काही काळ्या असतात तर काही मातेरी. भारतात या प्रकारच हरीण फक्त काश्मीर मध्ये पाहायला मिळते आणि यातून मिळणारी कस्तुरी ही पिवळ्या रंगाची असते. ही कस्तुरी फक्त नर हरणे तयार करू शकतात. मादा हरणे अश्या प्रकारच्या ग्रंथी बनवण्यासाठी सक्षम नसतात.

कस्तुरी फक्त सुवासासाठी नव्हे तर जादू व तंत्र विद्येत देखील वापरली जाते. जर काम होत नसेल त्याच बरोबर खूप मेहनत करून देखील तुम्हाला यश प्राप्ती होत नसेल तर अश्या वेळी. कस्तुरी घरी असावी तुम्हाला कोणत्याच कामात अपयश येणार नाही असे मानले जाते. काही तांत्रिक जगभरात या कस्तुरीच्या शोधात असतात. इतकेच नव्हे तर ही कस्तुरी विविध प्रकारची औषधे बनवण्यासाठी देखील वापरली जाते.

हे वाचा:   घरात एक जरी माशी दिसली तर हे एक सोपे काम करायचे.! पुढचे पंधरा दिवस एकही माशी घरात दिसणार नाही.!

अगदी पूर्वीच्या काळापासून जुने वैद्य या कस्तुरीच्या मदतीने अनेक आजार बरे करत असत. आता बाजारात अनेक बनावट केलेल्या कस्तुरी विकल्या जातात. मित्रांनो कस्तुरीच्या नावाने लोकांना टोपी लावली जाते. म्हणूनच आपल्याला खोटी कस्तुरी कोणती व खरी कस्तुरी कोणती यातील फरक कळणे गरजेचे आहे. मित्रांनो जी खरी कस्तुरी असते ती पाण्यात टाकली तर पाण्याला त्या कस्तुरीचा सुगंध येवू लागेल जर ही कस्तुरी खोटी असेल तर या पाण्याला घाण वास येवू लागेल.

त्याच बरोबर जर तुम्ही या कस्तुरीला तुम्ही जळतात तर यातून चामड्याचा वास येतो व खोट्या कस्तुरीतून छान सुगंध येवू लागेल. मात्र कस्तुरी मिळविण्यासाठी हरणं मारली जातात यावर प्रतिबंध घातला गेला पाहिजे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.