हजारो रुपये वाचतील, आजपासून पाया सूप खण्यास सुरुवात करा, या समस्यांपासून कायमचे मुक्त व्हाल.!

आरोग्य

अनेकांना चिकन मटण खूपच आवडत असते. याचे आपल्या आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. परंतु आपण याला विशेष स्वरूपात बनवून खाल्ले तर यामुळे आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मटन पाया सूप कशाप्रकारे बनवला जातो व याचे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदे आहेत हे सांगणार आहोत.

मटन पाया सूप मध्ये आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक घटक असते. पाय सूपमध्ये खनिजे, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फ्लोराइड, सोडियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची हाडे निरोगी राहतात. हे कोलेजन आणि यालुरोनिक ऍसिडचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे तुमची त्वचा सुधारते आणि नखे आणि केस मजबूत होतात.

पाय सूपमध्ये जिलेटिन असते जे तुम्हाला पोषक तत्वांचे पचन करण्यास मदत करते. ज्या लोकांना कंबर दुखी, सांधेदुखी, तसेच गुडघेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी या सूपचे सेवन नक्की करायला हवे. आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी याचे सेवन करावे. त्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होत असतो शरीरात मध्ये ऊर्जा ही भरपूर प्रमाणात मिळत असते.

हे वाचा:   शाम्पू लावण्याऐवजी लावा हा एक पदार्थ केसांसाठी फायदे इतके होतील की एकदा धन्यवाद नक्कीच म्हणाल.!

अनेकांना रात्री झोपताना त्रास होत असतो. म्हणजे झोप लागत नाही. परंतु या सूपचे सेवन केल्यास झोपे संबंधीच्या सर्व समस्या नष्ट होत असतात. त्यामुळे आपल्याला शांत झोपेचा अनुभव मिळत असतो. त्यामुळे याचे सेवन नक्की करायला हवे. ज्या लोकांचे वजन खूपच जास्त आहे अशा लोकांनी देखील याचे सेवन करावे. यामुळे वजन देखील भरपूर प्रमाणात कमी होत असते.

चला तर मग आपण बघूया हे पाया सूप कशा प्रकारे बनवले जाते. मंद आचेवर बनवलेले पाया सूप तुमच्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरीही पाया सूप तयार करू शकता. मटणाचे लेग पीस कांदा, लसूण, काळामिरीपुड, धणे, जिरं,मिरची, मीठ आणि तेलाच्या मिश्रणामध्ये मॅरिनेट करा. या मिश्रणाला प्रेशर कूकरमध्ये पाण्यासोबत लावा. त्यानंतर 5-6 शिट्ट्या करा.

हे वाचा:   कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याआधी रात्री करायचे फक्त एवढे एक काम.! दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला अशी चमक येईल जी कोणतेच प्रोडक्ट आणू शकणार नाही.!

मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा मीठ घाला आणि परत 2-3 शिट्या होऊ द्याव्यात. त्यानंतर गरमागरम पाया सूपवर मिरपूड टाकून त्याची चव चाखा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *