जर कुठे मिळालीच ही वनस्पती, तर झटकन तोडून आपल्याकडे ठेवा..एक नाही अनेक रोगांवर इलाज आहे ही वनस्पती..!

आरोग्य

जर कुठे सापडली ही वनस्पती, तर तोडून आपल्याकडे ठेवा..एक ना अनेक रोगांवर औषधी आहे ही वनस्पती. असाध्य असे असाध्य रोग ठीक करणारी आहे ही वनस्पती. या वनस्पतीचे धार्मिक महत्त्वही आहे. आज आम्ही तुम्हाला या वनस्पतीच्या आयुर्वेदिक गुणांबद्दल माहिती देणार आहोत. या वनस्पती चे नाव आहे आघाडा. मुळं, पानं, बीज, फळ, फ़ांद्या सगळेच औषधी गुणधर्मी असतात.

वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Achyranthes aspera असे आहे. आघाडा ही वनस्पती भारतात पावसाळ्यात सर्वत्र उगवते. अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत. या वनस्पतीच्या पानांचा मंगळागौरीच्या पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो.

आपल्या शरीरातील मूत्रवाहिनी, मूत्रपिंड यामध्ये बारीक काटेरी असणारे मुतखडे- युरिनरी स्टोन निर्माण होतात, त्यामुळे त्या रुग्णास पाठीत व कंबरेच्या भागात खूप वेदना होतात. अशा वेळेस आघाड्याच्या पानांचा रस सेवन केल्यास एक-दोन दिवसांत मुतखड्याचे बारीक कण सहज बाहेर पडतात.

हे वाचा:   या एका पानाने अनेक लोकांचे आजार पळवून लावले आहे.! आयुष्यभर घ्यावी लागणारी गोळी कायमची बंद करावी लागेल.! आयुष्यात एकदा तरी वापरा हे एक पान.!

आघाड्याच्या तुर्‍यांपासून वा मुळ्यांपासून डोळे येणे/सुजणे /लाल होणे इत्यादी वर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात. दातदुखी, डोकंदुखी, कफ, पित्त , कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर आघाडा संजीवनी च होय. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांवर चोळतात. पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात..

पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजवा. सकाळी ते वाटून रोग्याला दिल्यास पित्त बाहेर पडते. खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली थोडी राख मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला द्या .. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो.

खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण द्यावे. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव(काळे मीठ )मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटा.

हे वाचा:   आता प्रत्येक रिल्स व्हायरल जाणार.! इंस्टाग्राम वर खूप रील टाकून पण एकही व्हायरल जात नाहीये का.? हे एक काम करा.!

त्यात अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवा . हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येउ लागते. असा या बहुगुणी आघाड्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *