सलग एक महिना असे मेथी दाण्याचे पाणी पिल्यास काय होते, हे तुम्हीच बघा.!

आरोग्य

नमस्कार मंडळी, आज आम्ही तुम्हाला मेथी दाण्यापासून होणारे फायदे थोडक्यात सांगणार आहोत. स्वयंपाक घरात अगदी सहज उपलब्ध होणारे मेथीचे दाणे किती फायदेशीर आहेत याची तुम्हाला जाणीवही नसेल. स्वयंपाकात जास्त करून आपण याचा वापर सांबार, मुरांबा, लोणच्यात करतो. खूप लोक थंडीमध्ये मेथीदाण्याचे लाडूही बनवतात. काही घरांमध्ये मेथीच्या दाण्याची भाजी पण बनवली जाते.

खूप रोगांचा अंत होतो मेथीचे सेवन केल्यामुळे! आरोग्यासाठी जेवढी मेथी फायदेशीर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने सौंदर्यासाठी ही मेथी फायदेशीर आहे. केसं त्वचा यासाठी वरदान आहे मेथी. शुगर, उच्च रक्तदाब असलेल्यांनी रोज एक चमचा मेथी चे दाणे रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते पाणी कोमट करून प्यावे. अस केल्यानी तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

वजन कमी करण्यासाठी सुद्धा मेथीचे पाणी पिलं तर वजन व पोटावरची चरबी लवकर कमी होते. मेथी दाणे मिक्सर वर बारीक करून पावडर बनवा. ज्यांना सांधे दुखी, गुडघे दुखी कंबर दुखी यांचा त्रास आहे त्यांनी सुद्धा मेथीचे दाणे भिवलेले पाणी किंवा मेथीचे पावडर एक चमचा कोमट पाण्यात मिक्स करून दररोज सेवन केले पाहिजे. स्नायू बळकट होतात.

हे वाचा:   दातात आता पिवळेपणा तीळभर सुद्धा राहणार नाही.! दातांना खडी सारखे पांढरे शुभ्र बनवा या सोप्या ट्रिक ने.!

उष्ण गुणधर्म असल्याने थंडीच्या दिवसात तर मेथीचे दाणे कोणत्या ना कोणत्या रूपात अगदी सेवन केलेच पाहिजे. एन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म यात असतात. हाडांवर सूज आली असेल, हृदय रोगाची कुठली समस्या असेल तर यावर मेथीचे दाणे ही संजीवनीच आहे. कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करते मेथी! यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना कमी होते. गॅस ची समस्या दूर होते. किडनी स्टोन मध्ये मेथीदाण्याचे पाणी खूप फायदेशीर आहे.

दररोजच्या मेथीदाणे च्या सेवनाने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. दीर्घकाळासाठी तुम्ही तरुण दिसता. त्वचा तजेलदार व निरोगी होते. पंधरा दिवसातच तुम्हाला चेहऱ्यावर फरक जाणवेल. तुमच्या चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या, वांगाचे डाग, अगदी कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर मेथी सेवन मुळे रक्त शुद्ध झाल्यामुळे त्वचा सतेज होईल.

एक चमचा मेथीचे पावडर आणि ताज्या कोरफडीचा गर मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ नितळ होते. मेथीत भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फरस असल्यामुळे आपली हाडे तर मजबूत होतात त्याच सोबत केस गळती थांबते. दोन चमचे मेथीचे दाणे एका वाटीत घ्या. खोबरेल तेल अथवा मोहरीचे तेल मेथीचे दाणे पूर्ण भिजतील या प्रमाणात टाका.

हे वाचा:   हातापायाला येणाऱ्या मुंग्या कायमच्या जातील.! ज्या लोकांना पायाला येत होत्या मुंग्या त्यांनी ट्युबचा असा केला उपयोग, त्यांच्या पायाला येणाऱ्या मुंग्या कायमच्या थांबल्या.!

दोन ते तीन दिवस ही वाटी तुम्ही उन्हामध्ये ठेवा. हे झाले तुमचे मेथीचे तेल तयार! एका बाटलीमध्ये गाळून तुम्ही ते साठवू शकता. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस आपल्या केसांवर हलक्या हाताने या तेलाने मालिश करावी. विश्वास ठेवा हे तेल लावल्याने तुमच्या केसांची मुळे घट्ट होतात. कोंड्याची समस्या दूर होईल. तुमचे केस काळी, दाट आणि मजबूत होतील.

मेथी दाण्याची पावडर व दही मिक्स करून तुम्ही ते केसांवर हेअर मास्क म्हणूनही वापरू शकता. असे हे बहुगुणी मेथीचे चमत्कारिक फायदे जाणून तुम्हाला हे उपाय करण्यास नक्की आवडतील. कॅन्सर, हृदय विकार सारख्या मोठ्या रोगांना ही हे उपाय दूर ठेवतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *