हल्ली डोकेदुखी, अर्धशिशी ( मायग्रेन ), सायनस या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यावर आज एक रामबाण उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोबतच हाडे मजबूत करण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करू शकता. लहान मुलांची मेमरी शार्प होण्यासाठी याचा उपयोग होतो. स्ट्रेस मुळे होणाऱ्या अनिद्रा चा प्रश्न सुटेल. हा आजीबाईच्या बटव्यातील खास उपचार आहे. जो जुन्या काळी केला जाई.
नारळ, बदाम, खसखस…खसखस मुळे हाड मजबूत राहतात. खसखस खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात ऊर्जा/स्टॅमिना मिळतो. प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड,कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि थायामिन यात असते. अनिद्रेचा त्रास असलेल्यांनी रोज रात्री झोपताना एक चमचा खसखस दुधात टाकून प्यावे. चांगली झोप लागेल.
ही पावडर बनवून तुम्ही साठवू शकता. एका गोल गोटा नारळाला वरून छोटा तुकडा पाडून घ्या. तो नारळ खसखस आणि बदाम ने अर्धा अर्धा प्रमाणात पूर्ण भरा. अर्थातच या उपायासाठी तुम्हाला सुका नारळ लागणार आहे. ( गोटा खोबरे ) आता तो तुकडा पुन्हा त्यावर लावून नारळ बंद करा.
गायीचे दीड ते दोन ग्लास दूध घ्या. ते गॅस वर उकळायला ठेवा. वर सांगितल्याप्रमाणे खसखस आणि बदाम भरलेला गोटा खोबरे आता तुम्ही त्या दुधात उकळी आल्यावर टाका. गॅस मंद करा.कमीत कमी एक ते सव्वा तास आपल्याला ते या दुधात शिजवायचे आहे. थोडा थोडा वेळानी चमच्याने नारळ पलटी करावा. दूध आटेल आणि नारळावर साय जमा होणार नाही याची काळजी घ्यावी.
थंड झाल्यावरती हा नारळ दोन भागांमध्ये कापून घ्यावा. तुम्ही आत मध्ये पाहिलं तर बदाम खसखस चांगले शिजून कुरकुरीत झाले असतील. हे घेतल्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. त्या खोबऱ्याचे बारीक काप करा. आता हे मिश्रण मिक्सवर बारीक करावे. गोडीसाठी थोडीशी खडीसाखर घालावी. आपली बारीक पावडर तयार..
ही पावडर साधारण महिनाभर होते. 2 चमचे रोज रात्री एक ग्लास कोमट दुधा सोबत हे खायचे आहे. हा अनोखा आजीबाइंच्या बटव्यातील उपाय तुमच्या वरील सांगितल्याप्रमाणे सर्व समस्या नक्की दूर करेल. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.