आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत सुपर्ब, महत्वपूर्ण माहिती. ही माहिती त्या लोकांसाठी जास्त महत्त्वाची आहे ज्यांना रक्ताची कमी असते, थकवा येतो, चेहरा निस्तेज दिसतो.. सोबतच हे भाजीसोबत खाल्ले जाते. किंवा भाजीतही तुम्ही हे घालू शकता. हे बनवायचे कसे ते आपण पाहूयात.
त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत एक किलो बीटरूट(चुकंदर ). स्वच्छ धुवून घ्या. सालं काढून घ्या. बीटा मध्ये रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढवण्याची कमालीची शक्ती असते. हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते. त्यामुळे आपले पोट साफ तर होतेच. परंतु थकवा ही येत नाही. भाजीला ही सुंदर रंग येतो. बीट शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते.
डोळ्यांच्या कमजोर दृष्टी साठी गाजर आणि बिटाचा ज्यूस एकत्र करून प्यावा. नैसर्गिक फुड कलर म्हणूनही बिटाचा वापर केला जातो. मोठया किसनी ने सालं काढलेले बीट किसून घ्या. बटाट्याचा किसाप्रमाणे दोन दिवसात वाळवा. अत्यंत पाचक, सौम्य आणि महत्त्वपूर्ण सॅलेड पैकी एक असते बीट! हा बीटाचा किस कडक उन्हात प्लास्टिक किंवा थाळीत सुकवावे.
लहान मुलांसाठी, हाताच्या नस दुखीवर, डोळ्याच्या दृष्टीसाठी, मानसिक ताणतणाव यासाठी, शरीरातील रक्ताच्या कमतरतेसाठी, असे एक ना अनेक उणीवावर फायदे या बीटा मुळे होतात. याचा वापर कसा करावा? हा वाळलेला किस मिक्सर मध्ये बारीक वाटून त्याची पावडर बनवावी. खूप सुंदर रंगाची पावडर तुम्ही हवाबंद डब्यात मध्ये साठवू शकता.
थोडासा ओलावा पावडरमध्ये जाणवत असल्यास तुम्ही पुन्हा एकदा कडक उन दाखवा. एक चमचा ही पावडर घेऊन त्यात दोन चमचे पाणी घालून द्रव बनवून घ्या. हे तुम्ही भाजी मध्ये घाला. ते लोक बिट सॅलेड म्हणून खायला टाळतात त्यांच्यासाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे. पोषकतत्वे ही शरीरात जातात. तेही अत्यंत सोप्या मार्गाने!
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.