चमत्कारी लाडू.! गळणारे केस, वाढलेले वजन.! अशा सर्व समस्यांवर आहे हे लाडू फायदेशीर.! घरात करून ठेवा हे लाडू वेळ मिळेल तेव्हा खा आणि फरक नक्की बघा.!

आरोग्य

प्रत्येक ऋतूमध्ये मनुष्याच्या शरीराला काही ना काही समस्या सतावत असतात. पावसाळ्याच्या दिवसात आपल्यापैकी अनेकांना केसांच्या समस्या सतावत असतात. पावसाळ्याच्या दिवसात आपण अनेकदा भिजतो आणि यामुळे केस ओले देखील होतात. केस ओले झाल्याने केसांचे आरोग्य देखील खराब हो. अनेकदा केसांमध्ये कोंडा होतो. केस गळतात. केस तुटू लागतात.

केसांमध्ये जीवा, लिखा होऊ लागतात आणि अशावेळी या सगळ्या समस्या दूर करताना आपल्याला नाकी नउ येते. बहुतेक वेळा दिवसभर केस ओले झाल्याने सर्दी देखील होते. सर्दी झाल्यामुळे डोकेदुखी उद्भवते आणि या सर्वांमुळे सगळ्यात समस्या एका मागोमात एक उभ्या राहतात परंतु अजिबात चिंता करू नका. आजच्या लेखांमध्ये आपण अशा एका रेसिपी बद्दल जाणून घेणार आहोत.

ही रेसिपी तुमची डोकेदुखी तर पळवणार आहे पण त्याचबरोबर केसांचे आरोग्य देखील सुधारणार आहे तसेच अनेक जण वजन नियंत्रण यावर भर देत असतात. आपले वजन वाढू नये म्हणून आहारामध्ये वेगवेगळे पदार्थांचा समावेश देखील करत असतात आणि म्हणूनच ही रेसिपी तुमचे वजन देखील नियंत्रणामध्ये ठेवणार आहे आणि तुमच्या केसांचे आरोग्य देखील सुधारणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी आपल्याला कशी प्रकारे बनवायची आहे आणि या रेसिपीसाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे. अगदी कमी साहित्यांमध्ये देखील आपण ही रेसिपी सहज बनवू शकतो चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. आज ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बदाम लागणार आहे.

हे वाचा:   पुरुषांना मिळेल दहा पट बळ.! उत्साह आणि जोश वाढवण्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो.! वैवाहिक जीवन सुखमय बनवा असे.!

आपल्या सर्वांना माहिती आहे की, बदामा मध्ये खूप सारे औषधी तत्व व पौष्टिक पदार्थ असतात आणि म्हणूनच तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार आपल्याला बदाम एका पातेल्यामध्ये टाकून भाजून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपल्याला पांढरे तीळ लागणार आहे. पांढऱ्या तिळामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर कॅल्शियम ची मात्रा देखील जास्त असते.

बहुतेक वेळा जर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनचे मात्रा कमी झाली असेल तर केस गळू लागतात त्याच बरोबर प्रोटीन जर व्यवस्थित असेल तर आपल्याला वारंवार भूक देखील लागत नाही आणि म्हणूनच आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी पांढरे तीळ लागणार आहे. पांढरे तीळ देखील आपल्याला तव्यावर मध्यम स्वरूपामध्ये भाजून घ्यायचे आहे.

तीळ जास्त आपल्याला भाजायचे नाही अन्यथा तीळ जास्त जळून जाईल व चव देखील खराब होईल. आता आपल्याला जवस लागणार आहे. जवस मध्ये केसांच्या वाढीसाठी व शरीरातील फॅट कमी करण्यासाठी आवश्यक तत्त्व असतात, या तत्त्वामुळे तुमच्या शरीराला संरक्षण कवच प्राप्त होत असते. आता आपल्याला जवस देखील थोडेसे भाजून घ्यायचे आहेत.

हे वाचा:   उन्हाळ्यातील त्वचाविकार; या बियांचा फेस बनवून लावा, घामोळी, लालसर डाग, केसातील कोंडा सर्व होईल गायब.!

तीळ आणि जवस हे दोन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरच्या साह्याने बारीक वाटून घ्यायचे आहे व बदामाची पावडर देखील बनवायची आहे. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये थोडेसे तूप मिक्स करायचा आहे त्यानंतर हे सारे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून व्यवस्थित मळून घ्यायचे आहेत आणि त्याचे गोल गोल गोळे बनवायचे आहेत. हे गोळे म्हणजेच आपले लाडू तयार झालेले आहेत.

जर तुम्ही दिवसभरातून एकदा हा पौष्टिक लाडू सेवन केला तर तुमच्या शरीरातील अति लठ्ठपणा पूर्णपणे कमी होऊन जाईल व वजन देखील वाढणार नाही केसांच्या समस्या ज्या उद्भवलेल्या आहेत त्या देखील लवकर नष्ट होऊन जातील म्हणून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी देखील हा उपाय करू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.