मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केसांच्या तक्रारींवर अनोखा उपाय. केस गळू लागले की हृदय तुटतं. वयोमानानुसार केस सफेद होणे साहजिक आहे परंतु कमी वयामध्ये झालेले पांढरे केस तुमच्या केसांचे आरोग्य दर्शवतात. केसांना फाटे फुटणे ही देखील समस्या आज काल खूप दिसते. आता कोणतेही महागडे उत्पादन न वापरता आता करा केसगळती कमी आणि बनवा मजबूत दाट केस.
कोंडा होईल गायब. तुमचे केस होतील मउ, रेशमी,लांबसडक आणि काळेभोर..तेही अगदी कमी खर्चात..! थंडीच्या दिवसांमध्ये केसांची त्वचा खूप कोरडी पडते त्यामुळे वर जास्त कोंडा दिसू लागतो. कोंडा वाढला की पिंपल्स च्या समस्या देखील वाढतात. या सगळ्यावर एक जालीम उपाय आम्ही घेऊन आलो आहोत फक्त तुमच्यासाठी. १००% खात्रीशीर असा हा उपाय आहे.
आठवड्यातून फक्त एकदाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. असं केल्यास तुमच्या केसांच्या सर्व तक्रारी गायब होतील. आणि काही दिवसातच तुम्हीदेखील तुमचे सुंदर मोकळे केस flaunt करू शकता. मजबूत केस झाल्यावर तुम्ही केसांचे कोणती हेअर स्टाईल करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पेरूची पाने.
पेरू चे फायदे आपण सगळेच जाणतो परंतु पेरूच्या पानांचे फायदे तुम्हाला माहित आहे काय? पेरूच्या पानांमध्ये पेरू पेक्षा सुद्धा जास्त पोषक तत्व असतात. यात विटामिन बी आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. जे केस वाढीसाठी अत्यावश्यक आहे. कॅरोटीन आणि बायोटीन हे दोन्ही घटक यामध्ये भरपूर प्रमाणात असतात.
पेरूची १०-१२ ताजी पानं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पूर्ण धूळ नीट साफ करा. ही पानं स्वच्छ मिक्सर मध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. हा रस गाळून घ्या. कोंड्याची समस्या असलेल्यांनी या रसात एक चमचा दही मिक्स करून कापसाच्या मदतीने केसांच्या त्वचेवर मुळाशी लावा. कोंडा नसल्यास दही मिक्स करू नका.
यामुळे तुमचे केसामधील कोंडा ऍलर्जी पूर्ण गायब होईल. केस लांब काळे दाट होतील. हे लावायच्या आधी केस साफ धुवून घ्या. केसात तेल नको. लावल्यानंतर एक तास ठेवून साध्या पाण्याने केस धुवावे. केस मऊ रेशमी आणि मजबूत बनवण्यासाठी, एक ग्लास पाणी पॅन मध्ये घेऊन चार पेरूची पान आणि दोन चमचे चहापूड घालून १० मिनिटे मंद आचेवर उकळवा.
एकाच प्रयोगत कमालीचा फरक तुम्हाला जाणवेल. हे पाणी गाळून घ्या. पूर्ण गार होऊद्या. केस व्यवस्थित साफ असावीत हा उपाय करण्याआधी. यानंतर हे पाणी आपल्या केसात लावून हलक्या हातानी मसाज करायचा आहे. केस धुतल्यावर कंडिशनर लावतो त्या प्रमाणे हे वापरावे.
काही दिवसातच अतिरिक्त केस गळती थांबेल आणि तुम्हाला मिळतील सुंदर मऊ आकर्षक केस…! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.