शरीरात जमा झालेली घाण अशी बाहेर काढावी.! सगळ्यात सोपी पद्धत.! आजार तुमच्या पासून हातभर लांब राहतील.!

आरोग्य

धार्मिक पुस्तकांमध्ये तसेच आयुर्वेदात निरोगी राहण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदिक उपचाराची सुरुवातच देखील शुध्दीकारणाने केली जाते. तर मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे अश्याच एका उपाया बद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या शरीरामध्ये जमलेल्या घाणीला काढून टाकतात व शरीर शुद्ध करतात. यासाठी तुम्हाला कुठच्याही प्रकारची औषध खावी लागणार नाहीत. मित्रांनो त्या उपायच नाव आहे उपवास.

आश्चर्य वाटलं असेल ना उपवासाने शरीर कसा शुद्ध होईल. उपवासाचे नाव घेतले की सगळ्यांनाच भीती वाटते. कसे उपाशी राहायचं ? आजारी पडलो उपवास करून तर ? असे अनेक प्रश्न मनात येतात. चला तर मग बघूया उपवास कशी शरीरातील घाण काढून टाकतो. वेगवेगळ्या धर्मांमध्ये अध्यात्मिक कारणांमुळे उपवास केले जातात.

जस की मु’स्लि’म लोक रमजान महिन्यामध्ये १ महिना उपवास करतात, हिंदू लोक नवरात्री मधून उपवास करतात, बौद्ध भिक्षू दुपारच्या नंतर काही खात नाहीत. आपण आजारी असतो तेव्हा देखील भूक कमी लागते. प्राण्यांमध्ये देखील असेच असते ते आजारी असताना पण त्यांना भूक कमी लागते. उपवास करणं हे सामान्य आहे परंतु सारखे सारखे खात राहणं सामान्य नाही. विज्ञान आणि आयुर्वेद उपवास करण्याला मान्यता देतं.

उपवासाचे अगणित उपयोग आहेत जे शरीराला आतून शुद्ध करण्यास मदत करतं. उपवासामुळे शरीरातील पेशी न पेशी साफ होण्यास मदत होते उपवासामुळे ऑटोफॅजी निर्माण होते जिथे केवळ सर्वात निरोगी पेशी अत्यंत परिस्थितीत टिकून राहतात. सिस्ट, ट्यूमर, क.’र्करोग आणि इतर सर्व अस्वास्थ्यकर पेशी नाहीशा होतात. उपवासामुळे वजन कमी होणे, पचन व्यवस्थित होणे, चेहेऱ्याची चमक वाढणे, बुद्धी वाढणे, केसांची वाढ होण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   मूठभर शेंगा शुगर च्या पेशंटचे जीवनच बदलवून टाकेन, अशा प्रकारे खा आपोआप शुगर कमीकमी होत जाईल.!

उपवासामुळे चयापचय क्रिया देखील सुधारते. आधुनिक अभ्यासांनी असे सुचवले आहे की जोपर्यंत तुमच्या शरीरातील चरबी 4% पेक्षा कमी होत नाही तोपर्यंत उपवास पूर्णपणे ठीक आहे. उपवास करण्याच्या पण वेगवेगळ्या पातळ्या आहेत. पहिली म्हणजे भाकरी किंवा भाताला बाजरी, चाणा पीठ, ज्वारी , रागी, साबुदाणा याने बदला. याला उपवास म्हणता येणार नाही पण याने पचनसंस्था ला आराम मिळेल. दुसरी म्हणजे एक दिवस मीठ पूर्णपणे टाळा.

याने उच्च रक्तदाब सारख्या आजारांपसून सुटका मिळते. तिसरी म्हणजे मुद्दाम दुपारचं जेवण टाळा. चौथी म्हणजे दोन्ही वेळेचे जेवण टाळा व फक्त फळ आहार करा. पाचवी म्हणजे पूर्ण दिवस फक्त पाणी प्या. त्यानंतर पाणी देखील टाळा व पूर्ण उपवास करा. मार्गदर्शनाखाली कोणतीही व्यक्ती आरोग्याच्या समस्ये शिवाय 21 दिवस सतत उपवास करू शकते. उपवास हे चांगल्या भावनेने व सकाराात्मकतेने केले पाहिजे.

उपवास करताना मनात आनंद असणे गरजेचे आहे कोणत्याही प्रकारचा तणाव मनात नसला पाहिजे व उपवास कधीही जबरदस्तीने धरू नये. तुमचे शरीर स्वच्छ व शुद्ध होईल या भावनेने उपवास करा. तसेच तुमच्या पचनसंस्थेला आराम मिळेल या उददेशाने उपवास केले पाहिजे. उपवास हे जसे नीट कारणे महत्त्वाचे आहे तसेच ते नीट तोडणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. उपवास हे कायम लिंबू , पाणी, मध, किंवा फळांनीच उपवास तोडले पाहिजे.

हे वाचा:   वैवाहिक पुरुषांनी जर कधी रात्री झोपते वेळी पिले अशा प्रकारचे दूध तर होईल असा गजब फायदा, वैवाहिक जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील.!

एकादशी ला उपवास करणे चांगले असते कारण त्यादिवशी ग्रहांची स्थिती चांगली असते.एक आदर्श ग्रहनिर्मिती जी भूक टिकवून ठेवते आणि शरीराला अशक्त बनवत नाही. शारीरिक, मानसिक, व अध्यात्मिक फायदे एकादशी उपवासामध्ये जास्त असते.जर १४ वर्ष पेक्षा वय कमी असेल, गर्भधारणा झालेली असेल किंवा आजारी असाल तर तुम्ही उपवास करू शकत नाही. उपवास हे एक जादू नाही. तर सत्य आहे.

तुम्हाला देखील याचा खूप फायदा होईल. तुमच्या शरीराची स्थिती बघून तुम्ही उपवासाचे नियोजन करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.