मित्रांनो, आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक वनस्पती जडीबुटी जीच नाव आहे हिंगलाज! ही वनस्पती सामान्यतः नदीकाठी पाणवठा काठी आढळते. यावर पिवळ्या रंगाचे मोह फुले उगवतात. हे झाडीदार वनस्पती आहे. याची पान गोलाकार मोठी असतात. माता हिंगलाज च्या मंदिराच्या आस-पास ही वनस्पती सगळ्यात अधिक आढळते.
याच मुळे याला हिंगलाज ची वनस्पती म्हणतात. आयुर्वेदामध्ये हिंगलाज वनस्पतीला दादमर्दन च्या नावाने ओळखले जाते. तसेच ही वनस्पती शेकडो रोगांवर प्रभावशाली आहे. वनस्पतीचे मूळ तसेच बिया आणि पानं यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. चर्मरोग किंवा त्वचा सम्बन्धी समस्यांमध्ये हिंगलाज च्या पानांचा प्रयोग खूप प्रभावशाली मानला जातो.
अस्थमा यांसारख्या श्वसन रोगामध्ये हिंगलाज च्या पानांचा काढ़ा त्वरित लाभकारी ठरतो. हिंगलाज ची मुळं देखील उपयोगी असतात लहान मुलांमध्ये नजर लागणे किंवा चिडचिडे होणे यामध्ये याची मुळं गळ्यात घालतात. या वनस्पती चा प्रयोग डाग, खाज, खुजली, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, टाचा फाटणे याशिवाय कुष्ठरोग इत्यादी मध्ये लाभाकरी असतो.
त्वचा सम्बंधित सर्व सदस्यांमध्ये याच अत्याधिक महत्व आहे. या वनस्पतीच्या पानांचा लेपाने त्वचा संबंधित सर्व विकारात इलाज केला जाऊ शकतो. या हिंगलाज वनस्पतीचा आणखीन फायदे होण्यासाठी याची ताजी हिरवी ५०ग्रॅम पान वाटून पेस्ट बनवा. यात १० ग्रॅम तुरटी मिसळून वाटून घाला. हा लेप प्रभावित त्वचा वर लावल्याने आराम मिळतो.
अवांतर माहिती: भारतातील मध्य प्रदेश च्या छिंदवाड़ा मध्ये माता हिंगलाज मंदिर च्या जवळ एक आयुर्वेदिक मेडिकेटेड गार्डन आहे.यामध्ये नव ग्रहांच्या अनुसार झाड लावली आहेत. भारतीय वेदांत वनस्पतींचे वृहद् ज्ञान संचित आहे. आदि काळा पासूनच मनुष्यला सगळ्यात अधिक मदत देणारे हे झाड झूडप किंवा वनस्पतीच आहेत.
भारतीय शास्त्रात पण ग्रह अनुकूल करण्याच्या हेतुने वनस्पतींची प्रमुख भूमिका मानली गेली आहे. संयोगाने छिंदवाड़ा मध्ये माता हिंगलाज च्या मंदिर च्या प्रांगणात ही सर्व झाड एक साथ आढळतात. असं म्हटलं जात की या बगीचा मध्ये स्वतः भगवान येतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.