हे एक पान ठरू शकते वरदान, अशा रुग्णांना या पानाबद्दल माहिती असायलाच हवी, कधी विचारही केला नसेल एवढे होतील फायदे.!

आरोग्य

मित्रांनो, आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत पेरूचे झाड या बद्दल ची माहिती. या पेरूचे फळ, पान, खोड आणि मुळं आपल्याला किती फायदेशीर आहेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आपण सगळ्यांनीच पेरू तिखट मीठ लावून चवीने खाल्लच आहे. पण या वनस्पतीच्या पानांच्या फायद्याबद्दल आपल्याला माहीत नसते.

यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुण लपलेले आहेत. दोन प्रकारचे पेरू बघायला मिळतात लाल आणि पांढरा गर असणारे. पेरुच्या पानांमध्ये तारुण्य टिकवणारे आवश्यक असणारे गुणधर्म असतात. पेरुमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियमही असते. यासोबतच दिर्घकाळ तारुण्यासाठी व आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी पेरुची पाने अतिशय लाभदायक असतात.

त्वचेच्या देखभालीपासून ते पोटाच्या सर्व समस्येपर्यंत अनेक गोष्टींवर रामबाण उपाय म्हणून पेरुच्या पानांचा उपयोग होतो. पेरुचे ताजे पान स्वच्छ धुवून घ्या यावर थोडे सैंधव मीठ घालून ते विड्याच्या पानाप्रमाणे चावून खा. यामुळे मळमळ, उलटी, आंबट ढेकर आणि पोटदुखी यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. जर तुम्हाला जेवल्या नंतर किंवा दूरचा प्रवास केल्यानंतर मळमळ किंवा उलटीची समस्या असेल तर तुम्ही हा प्रयोग करावा.

हे वाचा:   आपल्या मुलांना मोबाईल खेळायला देण्याआधी हे वाचा.! मुलांना मोबाईल मुळे काय होऊ शकते.? थक्क करणारी माहिती समोर.!

पेरूच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल anti-inflammatory गुणधर्म असतात. दातदुखी मध्ये पेरूची ताजी पाच ते सहा पाने पाण्यात उकळवून घ्या. या पाण्याने गुळना करा तुमची दात दुखी त्वरित थांबेल. मधुमेहामध्ये रक्तातील वाढलेली साखर कमी करण्यासाठी पेरुच्या पानांचा रस अतिशय लाभदायक ठरतो. हा रस नियमित घेतल्यास रक्तातील वाढलेली साखर कमी होऊन मधुमेह नियंत्रित राहतो.

तसंच वजन कमी करण्यासाठीही पेरुची पाने उपयुक्त असतात. शरीरातील फॅटस वाढविणाऱ्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेरुची पाने खाल्ल्यास फायदा होतो. शरीरावर गाठीयेणे यात उपाय म्हणूनही पेरुच्या पानांचा वापर केला जातो. दुखणाऱ्या गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास सूज कमी होण्यात आपली मदत होते. पेरूंमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर असते.

हे वाचा:   संक्रमणामुळे घशामध्ये कधी त्रास होऊ लागला तर या तीन उपायांपैकी एक उपाय पटकन करावा, खात्रीशीरपणे फायदा होईल...!

यामुळे त्वचेवर येणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यावर लाभदायक ठरतात पेरू. पेरूचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि सतेज दिसायला लागते. पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असल्याने त्वचेवरील मोईश्चर टिकून राहते. आजकाल अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील पेरूच्या गराचा वापर केला जातो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *