थंडीत खराब झालेले ओठ पुन्हा सुंदर बनवायचे असतील तर आताच करा हा जबरदस्त उपाय होईल भरपूर फायदा.! सुंदर गुलाबी ओठ बनवा असे.!

आरोग्य

थंडी वाढू लागली की बरेच लोकं बॉडी लोशन, सन्सस्क्रीन लोशन इत्यादी वापरून त्वचेची काळजी घेतात पण ओठांची योग्य काळजी मात्र घेतली जात नाही. अशा परिस्थितीत हायड्रेशन आणि पोषणाच्या अभावामुळे तुमचे ओठ कोरडे आणि रंगहीन होऊ लागतात. तर तुम्ही ओठांची योग्य काळजी न घेतल्यामुळे ते काळे होऊ लागतात.

अर्थात सिगरेट मुळे ओठ काळे होतात हे वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे ही सवय बदला. आजकाल तर बाजरात अनेक उत्पादन उपलब्ध आहेत ज्यात रासायनिक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे पुन्हा आपल्या ओठांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. याशिवाय आज-काल सौंदर्यातील तज्ञ डॉक्टर देखील महागडे उपाय सर्जरी सुचवतात.

पण जर अगदी नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चात तुमचे ओठ पुन्हा गुलाबी मऊ असे होत असतील तर? चला तर मग जाणून घेऊयात आजचा हा उपाय त्यामुळे अगदी कमी वेळेत तुम्हाला मिळतील मउ,सुंदर, गुलाबी ओठ!

हे वाचा:   कफ असणाऱ्या लोकांनी सावधान व्हा; ही पाच कामे कराल तर 100% आजारी पडाल.!

तर आजच्या या उपायात आपल्याला लागणार आहे भरड दळलेली पिठीसाखर. दोन लहान चमचे अशी भरड बारीक केलेली साखर एका बाउल मध्ये घ्या. यात एक मध्यम आकाराचे अर्ध लिंबू कापून बिया काढून पिळा. पुढे अर्धा चमचा व्हॅसलिन जेली घालून मिश्रण नीट फेटा. हे व्यवस्थित एकजीव झाल्यावर बोटांनी ओठांवरती लावून घ्या.

हा उपाय सलग करत रहा. यातील साखर स्क्रब चे काम करते तर लिंबू टॅन घालवते व जेली मुळे ओठ नरम राहतात. काही दिवसातच तुम्हाला तुमचे मूळ मऊ, सुंदर गुलाबी ओठ मिळतील…! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   डोळ्याखाली काळे सर्कल तयार झाले आहेत, चिंता करू नका टोमॅटो दाखवून देईल आपली जादू.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *