आपण सुंदर दिसावं असं कोणाला वाटत नाही? यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. यासाठी बाजारातील अनेक महागडे उत्पादनदेखील वापरून बघतो. कारण आपल्याला वाटत असतं हे ठीक असेल ते ठीक असेल. पण अनेकदा आपल्या आसपास असणाऱ्या वस्तू बद्दलच आपण अनभिज्ञ असतो. काही नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण सुंदर दिसू शकतो परंतु आपल्याला याबद्दल माहिती नसते.
असंच एक उपाय आज आपण बघूया. आज आपण एक घरगुती नाईट क्रीम जी अँटी एजिंग आहे कशी बनवायची. यामुळे तुमचं सौंदर्य कमालीचे द्विगुणित होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे गोकर्ण चे फुलं. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये याचा वापर केला जातो याबद्दल तुम्हाला आजच माहिती मिळाली असेल. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
हे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते. रात्री पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून हे क्रीम झोपताना लावावे. गोकर्णाचे दहा फुलं घ्या. त्याची हिरवी देठ काढून टाका. निळा भाग एका बाटलीत घेऊन त्यात गरम पाणी घाला. बाटलीचे झाकण बंद करा. काही मिनिटातच त्यातील नैसर्गिक रंग पाण्यात उतरतो. हे साफ स्वच्छ मिक्सर मध्ये अजून थोडं पाणी वाटून घ्या.
आणि एका पातळ फडक्याने वस्त्रगाळ करून घ्या. एक चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्ध्या वाटी या पाण्यात घाला. नुसते पाणी उरले असेल तर ते तुम्ही मेकअप रिमूव्हर किंवा टोनर म्हणून वापरू शकता. पुढे एका कढई मध्ये पाणी उकळण्यास ठेवा. आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेली वाटी कढई मध्ये पकडीने धरा. चमच्याने मिश्रण सतत ढवळत राहावे कॉर्नफ्लॉवर मुळे हे पाणी घट्ट होईल.
२-३ मिनिटात एक जेल प्रमाणे घट्ट मिश्रण तयार होईल. ही वाटी बाहेर काढून थंड करा. एका वाटीत दोन चमचा कोरफडच जेल घ्या. यात तीन व्हिटॅमिन ई चे कॅप्सूल मधील तेल घाला. हे मिश्रण एकत्र करा. यानंतर बदमाचे एक ते दीड चमचा तेल घाला.(नसल्यास खोबरेल तेल घाला.) पुढे गोकर्ण आणि कॉर्नफ्लॉवर चे बनवलेले जेल यामध्ये घाला. झाली आपली क्रीम तयार.
ती क्रीम आपण फ्रीजमध्ये ठेवून रोज रात्री चेहर्यावर लावावी. क्रीम जास्त घट्ट वाटत असेल तर उरलेले गोकरणा चे पाणी थोड-थोड घालून एक क्रीम चे टेक्चर येईपर्यंत मिसळा. एका बाटलीत भरून ही क्रीम ठेवा. कमी खर्चात जास्त फायदेशीर आयुर्वेदिक पद्धतीने घरी बनवलेली ही क्रेन तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल. अशा आहे आज सांगितलेला हा अनोखा उपाय तुम्हाला खूप आवडेल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.