डेंग्यू चिकनगुनिया सारखा आजार या उपायाने करू शकता बरा, सर्दी, खोकला, ताप असेल किंवा घसा खवखवणे असेल तर एकदा नक्की करून बघा हे उपाय.!

आरोग्य

थंडीचे वातावरण आहे. वातावरणातील बदलांमुळे आपल्या घरात आजारी असण्याचे प्रमाण वाढते प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात. सर्दी, खोकला, ताप येणे हे तर अगदी ठरलेलेच असते. नुकताच आलेला कोव्हीड, डेंग्यू, चिकनगुनिया अनेक प्रकारचे व्हायरस यामुळे आपल्या घरात अनेकदा ताप येतो. शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. सर्दी खोकला शिंका येणे असे फटाफट झाल्याने आपण घाबरून जातो.

अशात काही घरगुती उपाय जे तुम्हाला आजूबाजूला सहज उपलब्ध होतील अशा वस्तूंनी बनवलेले आहेत असे उपाय तुम्ही केल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल. शरीराला आतून ताकद वर बनवणे पाहिजे. यासाठी हा उपाय करून बघा. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे गुळवेल. जी आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते. याची दांड्या आपल्याला लागणार आहे.

आपल्या अंगणात देखील हे झाड नक्की लावा. एक गुळवेल ची दांडी घेऊन ती खलबत्त्यात कुटावी. यामुळे तुमचे सर्दीपासून बचाव तर होईलच शिवाय तुमचे वजन कमी करण्यात मदत होईल. पोटावरील अतिरिक्त चरबी यामुळे कमी होते. एका भांड्यात हे वाटलेली गुळवेल घ्या. त्यात दीड ग्लास पाणी घालून गॅस वर उकळण्यास ठेवा. यामध्ये ८-१० तुळशीची पानं घाला.

जी प्रत्येकाच्या अंगणात अगदी सहजच असते. हे मिश्रण अर्धा ग्लास होईपर्यंत उकळवा. गॅस बंद करुन हे मिश्रण पिण्याजोगे कोमट होईपर्यंत थांबा. पिण्याजोगे कोमट झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि घोटाघोट करून प्या. हे पेय आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी पिण्याचा सल्ला देऊ. मधुमेहाच्या रोग्यांनी देखील हे पेय पिल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल.

मधुमेह नसलेल्यांनी यामध्ये एक चमचा मध घालून याचे सेवन करावे. ज्यांना प्लेटलेट्सची कमी आहे त्यांनी हा उपाय करते वेळी गुळवेल सोबतच पपई चे पानं देखील वाटून या काढ्यात वापरावी. तुम्ही स्वतः चमत्कार अनुभवाल. अजून काही घरगुती उपाय.. लसूण हलका भाजून सकाळी गरम पाण्यासोबत गोळी प्रमाणे खा. लहान मुलं हे घेऊ शकत नाही. लसूण पावडर यात मध घालून गरम पाण्यासोबत हे चाटण घ्यावे.

लसूण खात नसल्यास मधात सुंठ पावडर घालून, काळी मिरपूड आणि दोन चार थेंब लिंबूरस हे मिश्रण बनवून सेवन करा. सर्दी खोकला घसा खवखवणे सगळे होईल गायब…! यानंतर कोमट पाणी प्यायला विसरू नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published.