आता काहीही खा आणि ॲसिडिटीची चिंता विसरून जा, आयुष्यात पुन्हा चुकून सुद्धा होणार नाही ॲसिडिटीचा त्रास.!

आरोग्य

मित्रांनो आज आपण घरी एक वेगळ्या पद्धतीने चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. होय होय चहाच! तुम्ही म्हणाल आम्ही रोज चहा पितो परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा चहा काही साधासुधा चहा नव्हे! यामध्ये असणार आहेत मसाल्यातील असे काही घटक ज्यामुळे तुमच्या शरीराला अनन्यसाधारण फायदे होतील. चला तर मग फार वेळ न घालवता चहा कसा बनवायचा, यामध्ये कोणते घटक लागतात आणि त्याचे आपल्याला काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.

तसं तर एरवी ऍसिडिटी होण्यासाठी एक कारण चहाचे पुढे केले जाते. परंतु हाच आपण बनवू तो चहा मात्र तुमची ऍसिडिटी करेल कायमची मुळापासून गायब. याशिवाय चवीला हा चहा अप्रतिम असतो, त्यामुळे कोणत्याही कडू औषधाप्रमाणे हे तुम्हाला बळजबरीने इच्छा नसताना नाक मुरडून पिण्याची गरज भासणार नाही.

दिवसाला अतिप्रमाणात चहा पिणे शरीराला हानीकारक आहे. बरेच लोक काळा चहा तर काही लोक नुसत्या दुधाचा चहा करून पितात. दोन्ही प्रकारचे चहा शरीरास घातकच होय. तसेच अति प्रमाणात उकळलेला चहा शरीराला विष समान असतो. यामुळे आपली पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना विनाकारण तोंड द्यावे लागते.

हे वाचा:   बिर्याणी चा इतिहास.! आवडीने खाणारी बिर्याणी नेमकी भारतात आली तरी कुठून माहिती आहे का.?

नुसत्या दुधाचा चहा पिल्याने देखील पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफुगी असे वेगवेगळे आजार आपल्या शरीरात जडतात. अनेक जण आले, गवती चहा घालून चहा पितात. परंतु अतिप्रमाणात असा चहा पिल्याने देखील शरीरातील उष्णता वाढून तोंड येऊ शकते. बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. झोप कमी होणे यांसारख्या तक्रारींना तोंड द्यावे लागते.

आपण जो चहा बनवण्यास आज पाहणार आहोत त्या चहामुळे शरीरातील चाळीस प्रकारचे रोगांचे निवारण होते. विशेष म्हणजे हा चहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पिऊ शकतात. असा हा चहा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे..एक ग्लास पाणी उकळण्यास ठेवा. यामध्ये एक छोटा तुकडा दालचिनी/ दालचिनी पावडर घाला. दालचिनी मुळे रक्तदाब आणि रक्त घट्ट होणे यासारख्या समस्या नियंत्रणात राहतात.

आता यामध्ये पाव चमचा बडीशेप घाला. यामुळे तुमच्या शरीरात एनर्जी घेऊन पोट साफ होईल. यात एक विलायची घाला. चिमूटभर हळद घाला. हे मिश्रण नेहमीच्या चहा प्रमाणे व्यवस्थित उकळवून घ्या. शुगर नसल्यास यात एक छोटा तुकडा गुळ घाला. डोळ्यांचे, पोटांचे, रक्ताचे सर्व प्रकारच्या समस्या हा चहा ठीक करेल. हा चहा उकळल्यानंतर गाळून घेऊन कपामध्ये नेहमीच्या चहा प्रमाणे घोट-घोट करत प्यावा.

हे वाचा:   तुमचे डोळे आले असेल तर, डोळ्याला पाणी येते का.? डोळे लाल होते का.? या तीन घरगुती उपायाने डोळे पूर्णपणे बरे होतील.!

यामध्ये दूध घालणार असाल तर गुळा ऐवजी तुम्ही एक दीड चमचा मध देखील घालावा. गुळाने दूध खराब होण्याची शक्यता असते. मध देखील चहा गाळल्यानंतर कपामध्ये घालून चमच्याने हलवून घ्यावे. चहा उकळत असताना मध घालू नका. लक्षात घ्या अनेक लोकांना खूप काम करायचे असते त्यामुळे झोप जाण्यासाठी म्हणून वारंवार चहाचे कप केले जातात.

परंतु असे करू नका हे आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. शरीराला मेंदूला रुदयाला कोणत्याही प्रकारचा अतिताण देऊ नका. आवश्यक तेवढा आराम अवश्य करा. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *