वर्षानवर्षं गजकर्ण अंगावर ठेवणाऱ्यांनो आता हा उपाय करा आणि गजकर्ण कायमचे घालवा, त्वचाविकार वर सर्वात प्रभावशाली उपाय.!

आरोग्य

मित्रांनो, आयुर्वेदाच्या दृष्टीने बहुतांश त्वचारोग हे आंतरिक दोषांचे बाह्य स्वरूप आहे. आंतरिक दोष म्हणजे बात पित्त कफ यांचे संतुलन बिघडणे. यासाठी अभ्यास एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांच्यासोबत कधीही आंबट पदार्थांचे सेवन करू नये असे आयुर्वेद सांगते. दूध मीठ, फळे दूध, दूध आणि मासे हे असे पदार्थ देखील एकत्र खाणे वर्ज्य मानले आहे.

दैनंदिन आहारामध्ये मीठ आणि खारट पदार्थांचे प्रमाण कीती असावे याकडेही नीट लक्ष दिले पाहिजे. आपल्या नकळत अनेक प्रकारचे लोणचे, पापड, चटण्या, वाळवण, कोशिंबिरी यामधून खूप मीठ खाल्ले जाते. मीठ आणि मसालेदार पदार्थ यांचे आहारातील प्रमाणाची विशेष दखल घेतल्यास त्वचारोग लवकर बरे होतात. आयुर्वेद सांगते की, ज्या वस्तू असेच ठेवल्यावर आप्पा पाणी सुटते त्या वस्तू त्वचारोग वाढवतात.

जसे गुळ, दही इत्यादी. पावसाळ्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेचे विशेष ध्यान ठेवावे लागते. वेळोवेळी पोट साफ करणे देखील त्वचाविकार लवकर आटोक्यात येण्यासाठी आवश्यक असते. त्वचारोग देखील विभिन्न प्रकारचे असतात. जसे नायटा, गजकर्ण, घामोळ्या, ॲलर्जी, गळू, पुरळ, नागिन, चिखल्या, कोड इत्यादी. उपाय करण्यापूर्वी तुमचा नेमका त्वचारोग कोणता आणि त्यामागील नेमके कारण तुम्हाला माहित करून घेणे गरजेचे असते.

हे वाचा:   आंधळे होण्याआधी नक्की वाचा.! मोबाईल बघून बघून डोळ्याचे वाटोळे झाले आहे.! त्यासाठी आजपासूनच व्हा सावध आणि करत जा हे एक काम.!

बऱ्याचदा प्रदूषण, घाम, शारीरिक अस्वच्छता, ओले कपडे घालणे, अंग कोरडे न करता कपडे घालणे, संसर्गजन्य, एकमेकांचे कपडे-उशी वापरणे, कोंडा होणे, उष्णता असे प्रामुख्याने कारणे आढळून येतात. अवघड जागी असा रोग झाल्यास त्याचा उपचार करणे अजूनच कठीण जाते. परंतु घाबरून जाऊ नका यावर पूर्णपणे इलाज होऊ शकतो. आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सुचवत आहोत.

तो तुम्ही नक्की करून बघा 100% खात्रीशीर नैसर्गिक उपाय असल्यामुळे तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही. या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत कारले. कारले स्वच्छ पाण्याने धुऊन सुकवून घ्या. लहान आकारात याचे काप करून घ्या. हे काप मिक्सर मध्ये घालून दोन ते तीन चमचे पाण्यासोबत बारीक वाटून घ्या. अनेक प्रकारचे औषध मलम काय करून तुम्हाला कोणताही फायदा झाला नसेल तर, आज खुजली मध्ये तुम्ही हा उपाय करा.

देशी कापूर चार ते पाच वड्या घ्या त्या कुटून पावडर बनवा. यात दोन चमचे खोबरेल तेल मिसळून घ्या. यामध्ये आपण बनवलेला कारल्याचा रस एक चमचा घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

हे वाचा:   एकदा दिवा लावा माशा मच्छर चा सडा पडेल.! माशा मच्छर घरात बघायला पण उरणार नाही.! हा जुगाड अनेक लोकांना माहिती नाही.!

हे मिश्रण बोटांच्या मदतीने शरीराच्या कोणत्याही प्रभावित जागी लावा. सुमारे वीस ते तीस मिनिटे हे असेच राहू द्या. या नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन तो भाग टॉवेलने व्यवस्थित कोरडा करावा. कापूर व कारल्यामुळे सर्व प्रकारचे इन्फेक्शन दूर होईल व दुखणं दूर होईल. खोबरेल तेल मुळे त्वचा मऊ होईल. सलग पंधरा दिवस हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला लवकर फायदा होईल.

आपले कपडे आणि वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. अंग व्यवस्थित कोरडे पुसूनच कपडे घालावेत. आपल्या त्वचेच्या आरोग्याची नीट काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *