झटपट पोट साफ करण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे, रात्रीतून फरक पडल्याशिवाय राहणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो, पौष्टिक आहाराचा अभाव आणि शारीरिक हालचालीची कमतरता झाल्यास पचनाच्या समस्या उद्भवतात. यामुळे बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठता (constipation)त्रास म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास लहानांपासून ते वयोवृद्धांमध्येही आजकाल मोठ्या प्रमाणात आढळतो.

उपाय जाणून घेण्यापूर्वी कारण माहित असलीच पाहिजेत. जाणून घेऊ कारण. जठराग्नी चांगले नसणे, पौष्टिक आहाराचा अभाव, वजन कमी किंवा जास्त असणे, मानसिक विकारांमुळे हा त्रास होऊ शकतो, कॅल्शियमयुक्त पदार्थांचे अतिरिक्त सेवन, शरीरात पाण्याची कमतरता असणे, दुधाच्या सेवनाचा अभाव, अंमली पदार्थांचे व्यसन, अति प्रमाणात चहा आणि कॉफी पिणे किंवा अगदी उच्च रक्तदाब आणि डिप्रेशनवर सुरू असलेल्या औषधोपचारांमुळेही हा त्रास उद्भवू शकतो.

अशी काही कारणे होत. जरी कधीकधी बद्धकोष्ठता होण्याची शक्यता फारच सामान्य असते , तरी काही लोकांना दीर्घकालीन बद्धकोष्ठता जाणवते. यामुळे गुदाशयात रक्तस्राव, फिशर मूळव्याध, डोकेदुखी, चिडचिडेपणा, तोंडाला दुर्गंधी, जडपणा, निरसता असे त्रास होतात. यावरून तुम्हाला समजले असेल की वेळेत उपाय करणे किती गरजेचे आहे.

हे वाचा:   गुलाबाचे रोप महिन्याभरात रोपेल.! आज एक काडी लावा एका महिन्याच्या आत गुलाबाला फुल येईल.!

तर जाणून घेऊ रामबाण असा घरगुती उपाय. यासाठी आपल्याला काळ्या रंगाची छोटी हरड (हिरडा ) एक हिरडा तोडून पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी उठून हे पाणी गरम करून प्या. दुसरा प्रकार, म्हणजे ८-९ हिरडा भाजून ठेवा. पोट साफ करण्यासाठी ही एक भाजलेली हरड खा. किंवा याची पावडर बनवून ही पावडर गरम पाण्यात घ्यावी.

लहान मुलांना सहानवर उगळून चाटण बनवून द्यावे. पोट एकदम साफ होईल. सर्व तक्रारी होतील गायब. टीप : १. या त्रासात अश्विनी मुद्रा, ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. अश्विनी मुद्रेमुळे हर्निया, गुदद्वारसंबंधीचे आजार, बद्धकोष्ठता इत्यादींचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. २. आहारात रोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक लघवी आणि मलाद्वारे बाहेर फेकले जातात.

हे वाचा:   लिंबू पाणी खरच वजन कमी करते का.? पोटावर चरबी घेऊन मिरवणारे एकदा हे नक्की वाचा.!

३. फायबरमुळे शरीरामध्ये मल जमा होऊन राहत नाही. शौचास त्रास देखील होत नाही. त्यामुळे आहारातील फायबरयुक्त घटक वाढवा. ४. पुरेशी प्रमाणात झोप आणि शारीरिक व्यायाम करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *