आता म’रेपर्यंत पित्त होणार नाही.! आयुष्यात पित्तासाठी गोळी कधीच घ्यावी लागणार नाही, अपचन, गॅस, तोंड येणे उलटी सर्व होईल बंद.!

आरोग्य

स्त्री चे खरे सौंदर्य हे तिच्या केसांमध्ये असते. कालांतराने केसांच्या काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होते आणि अचानक केस गळत आहेत रुक्ष झालेत पिकले आहेत याकडे लक्ष जाते. अनेक जबाबदाऱ्या, ताणतणाव, करिअर प्रवास, प्रदूषण यामुळे केसांच्या समस्यांचे संकट उद्भवते. कंगव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केस कळलेले बघितले की हृदय पिळवटून निघते.

जंक फूडच्या जमान्यात आपण याकडे दुर्लक्ष करतो परंतु वेळीच योग्य ती खबरदारी घेऊन उपचार केले तर या तक्रारींवर आपण मात करू शकतो. केस रुक्ष होणे, केसांची टोके दुभंगणे, चमकदार पणा कमी होणे, निस्तेज निर्जीव आहेत असे दिसून येते, कोंडा उवा लिखा होणे, विरळ होणे, अकाली केस पिकणे यांसारख्या एक ना अनेक जटिल समस्या आपल्यापुढे उभ्या राहतात.

आणि आपल्या सौंदर्याला ग्रहण लावतात. काही उपाय वर करण्याचे असतात तर काही गोष्टी शरीरात सेवन करायच्या असतात. आहारामध्ये फायबरयुक्त भाज्या, दूध दही ताक,हिरव्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्य, मका, डाळी, उसळी प्रथिनयुक्त पदार्थ यांचे अधिक प्रमाण वाढवा. व्हिटॅमिन डी ची सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना कमतरता जाणवते.

हे वाचा:   जपानी स्त्रिया एवढ्या चिरतरुण कशा राहतात.? काय आहे त्यांच्या सुंदरतेचे रहस्य.!

आजवर आम्ही तुम्हाला कांद्याचा रस, कढीपत्त्याची पाने,विटामिन ई, कोरफड, आवळा पावडर, मेहंदी पावडर, लिंबू, दही यांनी युक्त असलेले अनेक उपाय सुचवले आहेत. आज आम्ही तुम्हाला थोडा वेगळा पण अत्यंत फायदेशीर असा अजून एक उपाय सुचवत आहोत तोही तुम्ही नक्की करून बघा. यासाठी तुम्हाला लागणार आहे तीन केळी. केळी सोलून बारीक कापून घ्या.

यात एक मोठा चमचा नेस कॉफी पावडर घाला. हे मिश्रण मिक्सर वर एक चमचा पाणी घालून पेस्ट बनवा.यामध्ये दोन व्हिटॅमिन ई च्या दोन गोळ्यातील तेल काढून टाका. आपला हेअर पॅक तयार होईल. हे केसांच्या मुळांना तसेच कॉर्न केसांवर लावून घ्या. तीस मिनिटानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. दुसऱ्या दिवशी हर्बल शाम्पूने केस धुवा.

लक्षात ठेवा केस वेळेवर स्वच्छ न धुतल्यामुळे देखील केसांमध्ये घाम धूळ अडकते. यामुळे केसांचे रंध्रे मोकळी न राहता बंद होतात. परिणामी केस चिकट होऊन केसा मधील कोंडा वाढतो. केसांची चमक कमी होते व केसांमध्ये गाठी होतात, खाज येते. म्हणून केस वेळेवर धुणे महत्त्वाचे आहे. दीर्घ श्वसनाचे योगा केल्याने ताण-तणाव दूर होऊन तुम्हाला फायदा होईल.

हे वाचा:   घसा दुखी साठी याहून सोपा उपाय नाही.! घसा सुजू लागला तर पटकन करायचे हे एक काम.! या पाच गोष्टी घशाला नक्की आराम देतील.!

टीप : १.केसांमध्ये उवा किंवा कोंडा झालेल्या व्यक्तीचे कपडे, उशी, कंगवा हे वेगळे ठेवावे. २. आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपताना तेलाने हेड मसाज करावा. ३. रूक्ष कोरड्या गुंतणार या केसांसाठी चांगल्या प्रतीचे कंडीशनर आणि सिरम चा वापर करावा. ४. शिकेकाई रिठा किंवा सौम्य शाम्पूने केस धुवावे. ५. शक्य असल्यास रोज एक आवळ्याचे सेवन कोणत्या न कोणत्या प्रकारे करावे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *