मेंदू नंतर हृदयच आपल्या शरीराचे सर्वात महत्वाचे अवयव मानले जाते. केवळ एकटे हृदय आपल्या शरीरासाठी इतकी ऊर्जा तयार करते की एका ट्रकला ३०किमी चालवायला लागते. चिंतेचा विषय हा आहे की आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या अवयवा विषयी आपल्याला कमी माहिती आणि जागरूकता नसते. पोटदुखणे, डोकं ताप सर्दी झाल्यास याच्या लक्षणाने आपल्याला समजून जाते.
परंतु काय तुमचे लक्ष कधी त्या लक्षणांकडे गेले आहे का जे तुमच्या हृदया संबंधित आजाराचे संकेत देतात? जेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणत्याही अवयवात काहीही अडचण आल्यास ते आपल्यला वेगवेगळ्या प्रकारे सूचना देत असते. परंतु आपल्याला हे संकेत समजतच नाहीत. त्यामुळेच आजकाल जगातील अकाली मृत्यूचे प्रमाण हृदय रोगामुळे वाढले आहे.
२०१८ मधील एक सर्व्हे नुसार भारतातील हृदयविकाराने ग्रस्त लोकांपैकी ५०% लोकं चाळीशी पेक्षा कमी आहेत. सर्व अचानक झाले असं आपण म्हणतो. पण हे अचानक नसून सगळ्यात शेवटची पायरी आहे. अनेक महिने आधीपासून शरीर आपल्याला यासंबंधीचे संकेत देत असते. छातीत तीव्रदुखीचे कारण वेगळे देखील असू शकते. हृदया संबंधी छातीत तेव्हाच दुखते जेंव्हा दीर्घकाळ आपण काही लक्षण दुर्लक्षित करतो.
Cardiac Arrest आणि हार्ट अटॅक सारखे गंभीर परिस्थितीला येण्याआधीच थांबवले जाऊ शकते. यासाठी जाणून घ्या ही लक्षण…! ज्यामुळे तुम्ही वेळीच लक्षात घेऊन उपाय करू शकता. मान खांदे दुखणे तसे सर्वसाधारण आहे. परंतु दीर्घकाळ परत परत असे दुखणे होत असल्यास हे तुमचे हृदय बिघडत असल्याचे दर्शवत असते. Cervical spine समस्या देखील एक कारण असू शकते.
हृदय विकारात सहसा हात पाय थंड पडतात. कारण आपल्या हृदयाची रक्त पम्प करायची क्षमता कमी पडते. हात पायापर्यंत रक्ताभिसरण नीट होत नाही. एखाद्या व्यक्तीस कोणतीही शारीरिक मेहनत न करता देखील खूप घाम येत असेल तर कमजोर हृदय हार्ट अटॅक चा संकेत असू शकते. थंड घाम येणे हृदयात असलेले ब्लॉकेज दर्शवते. नपुसंकतेचा संबंध देखील हृदय संबंधी असतो.
जितके ५० पेक्षा जास्त वय असलेले लोकं ED(erectile dysfunction) फेस करतात त्यातील ४०% लोकांना clogged arteries मुळे होते. हृदय धडकणे आणि नीट श्वसन होणे आपआपसात संलन्ग असते. श्वास घेण्यास त्रास होणे संकेत असतो हृदयात काही बिघाड झाल्याचा. शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त नीट पोहोचत नाही. बसल्या बसल्या बैचेनी होणे योग्य नाही. नेहमी थकवा येणे.
रात्रभर जागणे खूप मेहनत करणे यामध्ये खूप थकवा येतो. यामुळे हृदयाचे स्वास्थ खराब होत असते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्या मेंदूची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होऊ लागते. याचा परिणाम हार्ट अटॅक आणि विसरणे यावर होतो. सलग पोटदुखी कायम होत राहणे हे एक रोगी हृदयाकडे इशारा करते. खूप ताणतणाव घेत असाल किंवा धूम्रपान करत असल्यास यामुळे हृदय विकारांना निमंत्रण मिळते.
सतत लघवी होणे किंवा दीर्घकाळासाठी लघवी न येणे. जबडा किंवा हिरड्यात कायम दुखणे. तेंव्हा हे सर्व जाणून घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. १०० पैकी ३०-४० लोकं हॉस्पटल मध्ये हृदय विकाराने मरतात. तेंव्हा जागरूकता ठेवा आणि स्वस्थ रहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.